प्रतिष्ठा न्यूज

संत भोजलिंग काका महाराज, व सुतार समाजाच्या बांधवांशी उद्धट व शिवीगाळ करणाऱ्या विठ्ठल पाटलाचा ठिक ठिकाणी जाहीर निषेध

प्रतिष्ठा न्यूज
लातूर / प्रतिनिधी : वारकरी संप्रदायाचे आद्य संत भोजलिंगकाका महाराज, व सुतार समाजाच्या बांधवांशी उद्धट आणि शिवीगाळ करणाऱ्या स्वतःला वारकरी म्हणणाऱ्या विठ्ठल पाटलाचा ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला आहे. त्याच बरोबर लातूर एम. आय. डि. सी. पोलीस ठाणे येथे ओबीसी समाजातील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन बोराडे यांच्या फिर्यादीवरून भा.द.वी. ५०७ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदर्शन बोराडे म्हणाले, विठ्ठल पाटील (काका ) अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्यासोबत 14 फेब्रुवारी रोजी परभणी महाराष्ट्र येथे होणाऱ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलन होत आहे यामध्ये मी त्यांना अशी विनंती केली की या साहित्य संमेलनामध्ये परभणी जिल्ह्यातील संतांचा उल्लेख व्हावा संताचा महिमा तसेच त्यांच्या कार्याचा उद्धार व्हावा या संदर्भात मी संत जनाबाई व संत भोजलिंगकाका महाराज ज्यांनी निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई, यांचा संभाळ केला यांचे चरित्र लोकांसमोर कळावे या संदर्भात चर्चा करताना त्यांनी अगदी माझ्याशी उद्धटपणे वागून अतिशय चुकीच्या पद्धतीने माझ्याशी बोलले मी त्यांना कल्पना दिली काका आपले दोघांच्या मधील बोलणं फोन कॉल रेकॉर्ड होत आहे तरीही त्यांनी मला उद्धटपणाने बोलले , भोजलिंग काकांची काय लायकी आहे, तुम्हाला चप्पल काढून तुमच्याकडे बघतो , व माझ्या आई वरून मला खूप गलिच्छ भाषेमध्ये ते बोलले याचा आडिओ मी आपल्याला या लिखित पोस्ट सोबत पाठवत आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण हा ऑडिओ ऐकावा व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी भोजलिंग काकांनी केलेले योगदान आणि सुतार समाजाच्या बांधवांशी बोलताना समाजाविषयी लोकांचे कशी वागणूक आहे याच्या ताजी उदाहरण आपण ऑडिओ ऐकावा. प्रत्येकाला विनंती आहे की आपण प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी विश्वकर्मा सुतार बांधव सुदर्शन बोराडे यांनी सदर तक्रारीत रितसर मांडले आहे.त्यामुळे एकाच धर्मात आसे घडत आसेल तर आमचा खरा धर्म कोणता.? धर्म माणसांसाठी आहे की ठेकेदारांसाठी.? खरा संत.. कि खरा वारकरी..? कोणावर विश्वास ठेवावे आसा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.