प्रतिष्ठा न्यूज

डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात मेरी मिठ्ठी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलशाचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे आज एन. एस. एस विभागाच्या वतीने तसेच, केंद्र सरकारच्या आदेशानुसार मेरी मिठ्ठ मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलशाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावातुन आणलेली एक मुठ मातीचे संकलन अमृत कलशामध्ये करतानाचा सेल्फी काढून तो शासनाने दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. ए. एस. कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, सचिव व प्र-प्राचार्या डॉ. विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी, ग्रंथपाल प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. ए. एस. जमादार, प्रा. एस. एस. घाटगे, प्रा. आर. आर. सरनोबत,प्रा. अरुण गावकर, प्रा. एच. एस. फरास, प्रा. एस. एस. देसाई इत्यादी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.