प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यात पुर परिस्थितीच्या ठिकाणी पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, स्टंटबाजी करण्याबाबत बंदी आदेश लागु;25 जूलै, 2024 वेळ – रात्री 8.30 वाजता 🌊 आयर्विन पूल, सांगली येथील पाणी पातळी 33 फुट 10 इंच; पातळी वाढणार; शाळा महाविद्यालयांना सुट्टी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सध्या सतत सुरु असलेल्या पावसामुळे कृष्णा, वारणा व येरळा या नदी क्षेत्रातील ओढे, नाले, बंधारे तुडुंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे पुराच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच पावसामुळे चांदोली (वारणा) व कोयना (कृष्णा) धरण साठयाचे पाण्यामध्ये वाढ होत आहे. धरण परिचलन सूचीप्रमाणे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरीता धरणामधून विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे.

धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदी पात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी खालील नमुद ठिकाणी नागरीक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. आयर्विन पुलावरुन तसेच नदी काठावरील असणाऱ्या गावामध्ये काही अतिउत्साही तरुण मुले व नागरीक पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, स्टंटबाजी करून सेल्फी घेत असल्याचे प्रकार घडत आहेत.

सदर पुर परिस्थितीचा विचार करून डॉ. राजा दयानिधी, जिल्हादंडाधिकारी, सांगली यांनी खालील नमुद ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडु नये याकरीता नमुद ठिकाण व त्यापासुन १०० मीटर परिसरात दिनांक २६.०७.२०२४ रोजीचे ००.०१ ते दिनांक ०६.०८.२०२४ रोजीचे २३.५९ वाजे पर्यत भारतीय नागरीक संरक्षण संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे मनाई आदेश पारित केले आहेत.

*सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका*
महापालिका मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष
🌊*वॉर रुम (आपत्ती व्यवस्थापन कक्ष)* 🌊

*दिनांक – 25 जूलै, 2024 वेळ – रात्री 8.30 वाजता*

*🌊 आयर्विन पूल, सांगली येथील पाणी पातळी 33 फुट 10 इंच*
🌊 आयर्विन पूल, सांगली येथील इशारा पातळी 40 फूट व धोका पातळी 45 फूट

*🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील पाणी पातळी 46 फुट 1 इंच*
🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील इशारा पातळी 45 फूट व धोका पातळी 57 फूट

*📞 आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक*
7066040330 / 7066040331 / 7066040332

मदत व बचावकार्य कक्ष
🚒 अग्निशमन दल 🚒 *📞संपर्क क्रमांक*
टिंबर एरिया, सांगली – 0233-2373333
स्टेशन चौक, सांगली -0233-2325612
कमानवेस, मिरज – 0233-2222610

दरम्यान सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस व मिरज तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.