प्रतिष्ठा न्यूज

निमणीच्या जय हनुमान विकास सोसायटी संचालक मंडळावर कारवाई संदर्भात अंतिम सुनावणी २१ ऑक्टोबरला

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : निमणी येथील जय हनुमान विकास सोसायटीच्या संचालक मंडळाने गोडाऊन बांधकाम,दूध संकलन व पशुखाद्य साठवणूक या उद्देशाकरिता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नाबार्डच्या PACS योजने अंतर्गत ४० लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले.
संस्थेच्या मालकीच्या जागेचे दुय्यम निबंधक तासगाव यांच्यासमोर रजिस्टर तारण गहाणखत करून त्या आधारे संस्थेच्या मालकीच्या ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविण्यात आला.
संस्थेने सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था तासगाव यांच्याकडे बँकेच्या मंजुरी पत्रासह बांधकाम मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावासोबत जोडलेल्या कागद पत्रांमध्ये फेरफार केल्याचे,मूळ खरेदी दस्त,तारण खतातील जागेच्या चतु:सीमा,चतु:सीमा चुकलेने नव्याने केलेला चूक दुरुस्ती लेख,वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार केलेले वहिवाट पत्र यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चतु:सीमा दर्शविण्यात आलेल्या आहेत.त्यामध्ये मोठी तफावत आहे,सरपंच ग्रामपंचायत नेहरूनगर यांचा खोटा दाखला जोडलेचे,तसेच उपविभागीय अधिकारी मिरज यांचा जमीन विक्री परवानगी आदेश,तहसीलदार तासगाव यांचा आवश्यकता परवानगी घेतल्याशिवाय बांधकाम न करणे बाबतचा आदेश,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांनी बांधकामास दिलेला स्थगिती आदेश, नियमाप्रमाणे सर्व संबंधित विभागाच्या आवश्यक परवानगी घेऊन बांधकाम करण्यास हरकत नाही असे लेखी कळवूनही जबरदस्तीने सुरू केलेले बांधकाम हे सर्व निबंधकाच्या निदर्शनास न आणता प्रस्ताव सादर केला होता, असा युक्तिवाद तक्रारदार हिंदी विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी सहाय्यक निबंधक यांच्यासमोर केला आहे. तक्रार केल्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला.बँकेला लेखी तक्रार दिल्यानंतर बँकेने कर्ज वाटप  थांबवले होते.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १४६ अन्वये संचालक मंडळावर कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस संचालक मंडळाला बजावली आहे.यासंदर्भात सहाय्यक निबंधक यांच्यासमोर सुनावणी सुरू असून अंतिम सुनावणी सोमवार २१ ऑक्टोबर २०२४ रोजी निश्चित केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.