प्रतिष्ठा न्यूज

रोटरी क्लब ऑफ विश्रामबाग तर्फे रविवारी मोफत कृत्रिम हात पाय शिबिर; गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 17 : गरजू दिव्यांगांसाठी येत्या 20 ऑक्टोबरला विश्रामबागमध्ये मोफत कृत्रिम पाय व हात शिबिराचे आयोजन रोटरीमार्फत करण्यात आली आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ विश्रामबागचे अध्यक्ष राहुल शहा व सचिव डॉ. मोनिका कुल्लोळी यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ विश्रामबाग, सांगली राऊंड टेबल 377, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी व साधू वासवानी मिशन पुणे यांचे वतीने रविवार 20 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी 1 वाजेपर्यंत विश्रामबाग येथील रोटरी मल्टीपर्पज हॉलमध्ये आर्टिफिशियल कॅम्प होणार आहे. या शिबिरात अद्ययावत टेक्नॉलॉजी द्वारा, फायबर पासून निर्मित अत्यंत हलके व मजबूत असे कृत्रिम हात पाय मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरा दिवशी रुग्णांची फक्त मापे घेतली जातील व त्यानंतर 30 ते 35 दिवसांमध्ये त्यांना हात किंवा पाय हे अवयव पुरवले जातील. या मोफत कृत्रिम हात-पाय शिबिराचा लाभ जिल्ह्यातील गरजूंनी घ्यावा, असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष शाह, डॉ. कुल्लोळी, सांगली राऊंड टेबलचे नील परीख व सहकाऱ्यांनी केले आहे. अमित पाटील अनिकेत धामणगावकर, डॉ. विजयश्री गाडवे, सागर चव्हाण, निखिल पैलवा भाविक ठक्कर आदी संयोजन करीत आहेत. जिल्ह्यातील गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी व संयोजक संस्थांनी केले आहे.
यावेळी माजी अध्यक्ष अमित पाटील, निल परीख, रोहित झंवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.