प्रतिष्ठा न्यूज

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभा मा. खासदार श्री. विशाल (दादा) पाटील यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आहेत. याबाबत पत्रव्यवहार करुन समन्वयाने काम करणेबाबत सुचना देणेत आल्या.

4. जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हामध्ये रेशनकार्ड धारक यांचे पुनर्विलोकन करुन जे बोगस लाभार्थी असतील ते कमी होऊन जे नवीन गरजु लाभार्थी असतील त्यांचा लाभार्थ्यांमध्ये समावेश होईल. यासाठी मोहिम हाती घेणे बाबत निर्देश देणेत आले जर धान्य वाटपामध्ये कोठे काही हरकती असतील तर त्याबाबत यंत्रणेकडे लोकांनी तक्रार करणेबाबत आवाहन करणे आहे.

5. प्रधानमंत्री सौरघर योजनेमध्ये लोकांचा सहभाग वाढविणेसाठी व्हेंडर व MSEB विभागामार्फत प्रचार-प्रसिध्दी कार्यक्रम हाती घेणेबाबत निर्देश देणेत आले.

6. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, व जि.प. कृषी विभागाकडील इन्स्पेक्टर यांना शेतक-याशी निगडीत तक्रारीची शहानिशा करणेसाठी दर महिन्याला किमान 10 तपासणीचे उदिष्ट देणेबाबत निर्देश देणेत आले.

7. माहिते वडगाव ता. कडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत फार जूनी झाली असले तर त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन तेथे नवीन इमारत घेणेबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

8. वाळवा येथील प्रा. आ. केंद्राचे ग्रामिण रुग्णालयामध्ये रुपांतर करणेसंदर्भात आवश्यक कार्यवाही करणेच्या सुचना देणेत आल्या.

9. आर. टी. ई. धोरण अंतर्गत सन 2017-18 पासून ज्या शाळांचे अनुदान प्रलंबीत असेल त्यांचे अनुदान तातडीने मिळेल अशी कार्यवाही करणेसंदर्भात निर्देश देणेत आले.

10 पूर्वी इंदिरा आवास योजनेतील काही लाभार्थ्‍यांचे अनुदान प्रलंबीत राहीले असेल तर ते संबंधीत लाभार्थ्यांना तातडीने देणेबाबत आवश्यक कार्यवाही करणेबाबत सुचना देणेत आल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.