प्रतिष्ठा न्यूज

“वंडर वुमन विंग्ज” संस्थेचा लोगो अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे 
सांगली : येथे वंडर वुमन विंग्ज संस्थेचा लोगो अनावरण सोहळा उत्कर्ष हॉल विश्रामबाग सांगली येथे उत्साहात संपन्न झाला. महिला सबलीकरण व सक्षमीकरण करण्याच्या हेतूने वंडर वुमन विंग्ज संचलित सबल ती नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. उद्योग करण्यासाठी लागणारी संधी व साधने उपलबध करून देणे हा हेतू ठेवून, समाजातील महिलांनी महिलांसाठी ही संस्था स्थापन केली आहे. यावेळी व्यापाराविषयी महिलांना साक्षर करण्याचा तसेच दिव्यांग महिलांसाठी कार्य करण्याचा मानस असल्याचा संचालिका स्नेहल मोरे-तबीब यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आशा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगितली. तसेच कार्यकारी संचालिका प्राजक्ता मदने यांनी या लोगो अनावरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. तसेच प्रसिध्द जीवनशैली प्रशिक्षक व प्रेरक वक्त्या नेहा जैन यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
    यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या सांगली जिल्हा समन्वयक निशा पाटील, मीना मदने, पद्मावती मोरे  यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.