प्रतिष्ठा न्यूज

संचालक महादेव पाटील यांच्या तक्रारीमुळे तासगाव बाजार समितीचें लाखो रुपये वाचले…दिवाळी बोनसच्या नावाखाली होणारी लूट थांबली…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : गेल्या अनेक वर्षांपासून तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचाऱ्यांवर नियमबाह्यरित्या बोनसची खैरात करण्यात आली असून,याबाबत आम्ही तक्रार केली होती,तक्रारीनंतर विशेष लेखापरिक्षण झाले,त्यामध्ये नियमबाह्यरित्या दिलेल्या बोनसवर बोट ठेवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांवर जो अतिरिक्त निधी बोनस म्हणून दिला तो वसुलीस पात्र आहे,असे लेखापरिक्षणात म्हटले असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.शिवाय नियमबाह्य रक्कमेपैकी 10 टक्के रक्कम स्व.आर.आर.पाटील यांचे बंधू सुरेश पाटील व चिरंजीव रोहित पाटील या चुलत्या – पुतण्याच्या घरात जाते,असाही आरोप त्यांनी केला.याबाबत पत्रकार परिषदेत महादेव पाटील म्हणाले,तासगाव बाजार समितीच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची परंपरा आहे.मात्र शासनाच्या नियमानुसार 8.33 टक्के एवढाच बोनस कर्मचाऱ्यांना देता येतो,मात्र तासगाव बाजार समितीमध्ये गेल्या वीस वर्षांपासून सुमारे 20 टक्केप्रमाणे निधी कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून देण्याची परंपरा होती.हा सगळा नियमबाह्यरित्या कारभार सुरू होता. यामध्ये कर्मचाऱ्यांना दहा टक्के एवढीच रक्कम बोनस म्हणून दिली जात होती, तर उर्वरित रक्कम संचालकांना दिवाळी भेट म्हणून तसेच सुरेश पाटील व रोहित पाटील या चुलत्या पुतण्याच्या घरात दिवाळीसाठी जात होती,असा गंभीर आरोप पाटील यांनी यावेळी केला.ते म्हणाले,याबाबत आम्ही तक्रार केली होती बाजार समिती शेतकऱ्यांची आहे,शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून ही बाजार समिती उभी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैशाचा अशा प्रकारे अपव्यय आम्ही खपवून घेणार नाही,अशी आमची तक्रार होती.याबाबत आमच्या तक्रारीनंतर 2020 – 21 चे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले.या लेखापरीक्षणामध्ये बाजार समितीने नियमबाह्यरित्या बोनस दिल्याचा ठपका ठेवण्यात आला.जी रक्कम नियमबाह्यरित्या देण्यात आली आहे ती वसुलीस पात्र राहील, असा शेरा ही विशेष लेखापरीक्षकांनी मांडला आहे.त्यामुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशाची बोनसच्या माध्यमातून उधळण होत होती,हे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे.तसेच बाजार समितीने 2020 – 21 मध्ये 13 लाख 20 हजार 510 रुपये, 2021 – 22 मध्ये 14 लाख 55 हजार 800 रुपये, तर 2022 – 23 मध्ये 17 लाख 15 हजार 569 रुपये बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना दिले आहेत.या तीन वर्षात 20 टक्के प्रमाणे सुमारे 44 लाख 91 हजार 879 रुपये इतके पैसे बोनससाठी उधळण्यात आले. प्रत्यक्षात 8.33 टक्केप्रमाणे 18 लाख 70 हजार 867 रुपये एवढीच रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळणे अपेक्षित होते.मात्र गेल्या तीन वर्षात बाजार समितीने सुमारे 26 लाख 21 हजार 11 रुपये इतकी ज्यादा रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस रूपात अदा केली आहे.हे बाजार समितीचे आर्थिक नुकसान आहे. तसेच शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाचा हा दुरुपयोग आहे.दरम्यान,आमच्या तक्रारीनंतर आता 2023 – 24 या वर्षाकरिता बोनस देण्यासाठी जो ठराव झाला तो नियमाप्रमाणे 8.33 टक्के याप्रमाणे देण्याचा निर्णय झाला.त्यामुळे यावर्षी 10 लाख 57 हजार 458 रुपये इतकी बाजार समितीची बचत होणार आहे.गेल्या वीस वर्षात बोनसच्या नावाखाली जी उधळण करण्यात आली त्यामधील 10 टक्के रक्कम ही त्या – त्या वेळच्या संचालकांना दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात आली.तर त्यातील बहुतांशी रक्कम सुरेश पाटील व रोहित पाटील यांच्या घरात दिवाळीसाठी गेल्याचा आरोपही यावेळी महादेव पाटील यांनी केला.
आमच्या तक्रारीनंतर यापुढे बाजार समितीचे दरवर्षी लाखो रुपये वाचणार आहेत आम्ही वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे. बाजार समितीचे वाचणारे पैसे हे शेतकऱ्यांच्या घामाचे आहेत.त्यामुळे यानिमित्ताने शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला आहे,असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.महामह mahade
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.