प्रतिष्ठा न्यूज

आशा होमिओपॅथी रुग्णालयामध्ये रविवारी होणार स्त्रियांसाठी होमिओपॅथी शिबिर

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : होमिओपॅथी तज्ञ डॉ. शैली शर्मा भोसले यांच्या आशा होमिओपॅथीतर्फे रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी विश्रामबाग येथे स्त्रियांच्या विकारांवर होमिओपॅथी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्त्रियांच्या विविध आजारांवर या शिबिरामध्ये मार्गदर्शन व उपचार करण्यात येणार आहेत. मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावर पांढरे जाणे, गर्भाशयाचा कर्करोग, वंध्यत्व, गर्भाशयाच्या पिशवीला सूज, पीसीओडी, स्तनाचा कर्करोग आदी स्त्रियांच्या विकारांबाबत या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या महिलांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना औषधोपचारावर ५० टक्के सवलत तसेच रक्त तपासणी व अन्य तपासण्यांमध्ये ३० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. विश्रामबाग येथील हॉटेल पै प्रकाश जवळील आशा होमिओपॅथी मध्ये दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिर होणार असल्याची माहिती डॉ. शैली शर्मा भोसले यांनी दिली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.