प्रतिष्ठा न्यूज

मोटार सायकल चोरी करणारे २ आरोपी जेरबंद ३ मोटार सायकल १,८०,०००/- रु. चा माल हस्तगत ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कामगिरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मोटार सायकल चोरी करणारे २ आरोपी जेरबंद ३ मोटार सायकल १,८०,०००/- रु. चा माल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना यश आले आहे.
याप्रकरणी १. गौरव सुंदर भोले, वय २१ वर्षे, पत्ता २. सुशांत सुनिल चंदनशिवे, वय २६ वर्षे, नाझी सैनिक बसाहत, भारतनगर, मिरज पत्ता म्हाडा कॉलनी, चिंतामणीनगर, सांगली या दोघांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती कावुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरी करणारे संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने दि. १७.१०.२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज

पवार व स्टाफ मिरज उपविभागात गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोहवा/९५६ दरिबा बंडगर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे गौरव माले, पत्ता भारतनगर, मिरज हा माझी सैनिक वसाहत, भारतनगर मिरज येथील त्याचे राहते घरासमोर चोरीतील मोपेड चाहने लपवून ठेवलेली आहेत.

तरी मिळाले बातमीच्या अनुषंगाने पोलीस पथक हे बातमीप्रमाणे त्याचे घरासमोर गेले असता नमुद इसम हा मिळून आला. त्यावेळी पोलीस पथकाने त्यास जागीच ताब्यात घेवुन त्याचे नाय व पत्ता विचारता त्याने त्याचे नाय गौरव सुंदर मोले, वय २१ वर्षे, पत्ता नाझी सैनिक वसाहत, भारतनगर, मिरज असे सांगितले. त्यावेळी त्याचे घरासमोरील दोन्ही मोपेड वाहनाबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्यांने सांगितले की, पांढरे रंगाची अॅक्टीवा मोपेड हे वाहन दोन महिन्यापुर्वी ऑक्सीजन पार्क, मिरज येथुन तर निळे रंगाची अॅक्टीवा मोपेड हे वाहन निपाणीकर कॉलनी, मिरज येथुन चोरुन आणल्याचे सांगितले. त्यावेळी सहा पोलीस निरीक्षक, पकंज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष त्यांचेकडे असलेल्या मोपेड मोटार सायकली बाबत मिरज शहर पोलीस ठाणे व महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेस वरील प्रमाणे गुन्हे नोंद असल्याची खात्री झाली. तरी सदरच्या दोन्ही अॅक्टीव्हा मोटार सायकल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त करुन आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन, पुढील तपास मिरज शहर, पोलीस ठाणे करीत आहेत.

तसेच पोहवा सतिश माने, अनिल कोळेकर, सागर लवटे व पोकों विक्रम खोत असे दिनांक १७.१०.२०२४ रोजी सांगली उपविभागात गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोहवा अनिल कोळेकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे सुशांत सुनिल चंदनशिवे, पत्ता म्हाडा कॉलनी, चिंतामणीनगर हा चोरीची नोटार सायकल घेवून अहिल्यादेवी होळकर चौक, सांगली येथुन जाणार आहे. तरी मिळाले बातमीच्या अनुषंगाने पोलीस पथक हे अहिल्यादेवी होळकर चौक, सांगली येथे सापळा रचून येणारे जाणारे वाहनावर वाँच करीत उभे असताना बातमीप्रमाणे पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपी सुशांत चंदनशिवे हा एका हिरो कंपनीचे पेंशन मोटार सायकल वरुन येत असताना दिसला त्याप्रमाणे पोलीस पथकाने त्यास थांबवून उपस्थित पंचासमक्ष त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सुशांत सुनिल चंदनशिवे, वय २६ वर्षे, पत्ता म्हाडा कॉलनी, चितामणीनगर, सांगली सांगितले. त्याचे ताब्यातील मोटार सायकल बाबत त्याचेकडे विचारपुस करता सदरची मोटार सायकल त्याने एक महिन्यापुर्वी सिव्हील हॉस्पीटल, सांगली येथून चोरी केल्याचे सांगितले. त्यावेळी पोहवा सतिश माने यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचासमक्ष त्याचेकडे असलेल्या हिरो कंपनीची पेंशन मॉडेलची मोटार सायकल बाबत माहिती घेतली असता सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाणेस गुन्हा नोंद असल्याची खात्री झाल्याने सदरची मोटार सायकल पुढील तपास कामी पोहवा, सतिश माने यांनी पंचासमक्ष जप्त करुन आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी विश्रमबाग पोलीस वाणेकडे वर्ग करण्यात आला असुन, पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत.

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली.मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था. गु. अ. शा, पोहवा सागर लवटे, अनिल कोळेकर, सतिश माने, दरिबा बंडगर, पोहवा नागेश खरात, गुंडोपंत दोरकर, सागर टिंगरे, अमर नरळे, संदिप नलावडे, श्रीधर बागडी, पोशि विक्रम खोत, सायचर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.