प्रतिष्ठा न्यूज

तासगांव दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे 30 एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती तासगांव व बार असोशिएशन तासगांव यांचेतर्फे रविवार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी दिवाणी न्यायालय तासगांव येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
लोक अदालतीत दावा पूर्व प्रकरणे, धनादेश प्रकरणे,तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे,कामगार वाद, दुरध्वनी, बिज, पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे,कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे व इतर तडजोड पात्र प्रकरणे ठेवता येणार आहेत. लोकन्यायालयात प्रकरणे निकाली झाल्यास कोर्ट फी ची रक्कम परत मिळते तसेच साक्षी पुरावा, उलटतपासणी,दिर्घ युक्तिवाद इ बाबी टाळल्या जाऊन पक्षकारांची वेळेची व पैशांची बचत होते.तरी जास्तीत जास्त पक्षकारांनी लोकन्यायालयामध्ये सहभागी होऊन “सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया,चला आपण लोकन्यायालयाच्या मार्गाने जाऊया अस म्हणत ३० एप्रिल रोजी होणाऱ्या लोकन्यायालयात आपली प्रकरणे ठेवून ती सामंजस्याने मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष श्री.ओ.एम.माळी यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.