प्रतिष्ठा न्यूज

मनसेच्या पाठिंब्याने तासगावात खासदार संजय काकांचे वाढणार बळ ; मताधिक्यात होणार वाढ

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या साठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे घोषीत केले.त्यामुळे सांगलीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या मताधिक्यात वाढं होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.त्याप्रमाणे तासगाव तालुक्यातील मताधिक्य सुद्धा वाढणार असून, तालुक्यातील मनसेचें जिल्हा संघटक अमोल काळे यांच्या माध्यमातून तालुक्यातील बऱ्याच गावात मनसेची संघटनात्मक बांधणी आहे.राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे याचा थेट फायदा संजय काका पाटील यांना होणार हें निश्चित.
तासगावच्या आबा काकांच्या बालेकिल्ल्यात अमोल काळे यांच्या मुळे अनेक गावात मनसेचें कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत.काळे यांनी विविध विषयांची तड लावत तालुक्यात मनसे जिवन्त ठेवण्याचे कामं केले असल्याने युतीत भाजपला बळ मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र तसा काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला,त्यामुळे तासगावचा विचार करता स्व.आर आर आबा व खासदार संजय काकांच्या तालुक्यात मनसेची काय अवस्था असेल बोलायला नको,मात्र अमोल काळे यांनी युवा वर्गाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत तासगाव तालुक्यात मनसेचे कार्यकर्ते तयार केले आहेत.शांत,संयमी,संवेदनशील तितक्याच आक्रमक असणाऱ्या या युवा नेत्याने मनसेच्या गाव तिथे शाखा काढण्यास सुरवात केली आहे.  तासगावसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या तालुक्यात कोणताही राजकीय वारसा व गॉडफादर नसताना हे सुरू आहे.अमोल काळे हा मनसेचा युवा नेता शेतकऱ्यांसह सामाजिक प्रश्नांवर संवेदनशील आहे.दुष्काळ जाहीर करणे,अवकाळी नुकसान भरपाई मागणी,तसेच शहरातील विविध प्रश्न मार्गी लावले आहेत.परप्रांतीय दलाल यांच्याकडून द्राक्ष फसवणूक केलेल्या अनेक शेतकऱ्यांचें पैसे मिळवून दिले आहेत.जिल्ह्यातील तरुण व्यसनाधीण होऊ नये यासाठी बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई,गोरगरीब लोकांची पिळवणूक करणार्यां खाजगी सावकार कृषी सहाय्यकाचें निलंबणं  करून लोकांना न्याय दिला.गव्हाण ग्रामपंचायतीचे निकृष्ट झालेले काम चांगल्या पद्धतीचे करून घेतले,तसेच लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अस्वच्छ हॉटेल चालकांना चाप लावून त्याच्यावर प्रशासनास कारवाई करण्यास भाग पाडले आहे. इन्शुरन्ससाठी शेतकऱ्याचा बेदाणा जाळंणाऱ्या कोल्ड स्टोरेज मालकांवर गुन्हा दाखल करायला लावणे असेल,विद्यार्थिनीला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करायला लावणे,शहरातील मराठी पाट्यांसाठी आंदोलन,शालेय पोषण आहार योजनेत धान्य चोरी करणाऱ्या ठेकेदारा विरोधात पाठपुरावा,तसेच तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बांधकामात झालेला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी गेले दोन वर्षे काळे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.अशा विविध विषयांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचे कामं अमोल काळे हें करत असून त्यांच्या मागे तालुक्यातील मोठा युवा वर्ग असून याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचे महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.