प्रतिष्ठा न्यूज

मारतळा संकुलातील हातनी येथील जिल्हा परिषद शाळेत- “शिक्षण परिषद” निपुण भारत- विविध गुण दर्शनाने संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी : लोहा तालुक्यातील मारतळा संकुलाचे केंद्रस्तरीय “शिक्षण परिषद” हातनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. 28 डिसेंबर 2022 रोज बुधवारी संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी माधवराव पाटील कदम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- देविदास गाडे, उपाध्यक्ष- साहेबराव वन्ने, उपसरपंच- संभाजी वन्ने, माजी सरपंच- सुनील भदरगे, माजी चेअरमन- गणेशराव हंबर्डे, माधवराव पोलिस पाटील, केंद्रप्रमुख- टी.पी पाटील, केंद्रीय मुख्याध्यापक- व्यंकट मुगावे सर उपस्थित होते.
प्रारंभी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे उपस्थित पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, यांनी कौतुक केले.
या “शिक्षण परिषदेत” इयत्ता 2 ते 5 या वर्गासाठी “निपुण भारत” अंतर्गत अभ्यास सर्वेक्षण रूपरेषा, मराठी, गणित, इंग्रजी, अभ्यास सर्वेक्षण, व माहिती तंत्रज्ञान, या विषयी सुलभकांनी सखोल मार्गदर्शन करून विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासा बद्दल केंद्रप्रमुख- टी.पी पाटील, पंचायत समिती लोह्याचे तज्ञ मार्गदर्शक- रामदास कस्तुरे, दौलतबादे, डी.एन.वाघमारे, लव्हेकर मॅडम, यांनी मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये देविदास बस्वदे सर, अशोक पाटील मारतळेकर, प्रल्हाद राठोड, सुधाकर थडके, संजय अंबुरे, बंडू भोसले, सुहास मुळे, आदीचा हातनी शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
ही शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिपकसिंह राठोड, रमेश मेडपलवार, हनुमंत चिवटे, रमेश धडीले, संगीता पाचकवडे, यांनी परिश्रम घेतले.यावेळी मारतळा संकुलातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण, शिक्षिका,शिक्षण प्रेमी माता, पालक, वशाळेतील सर्व विध्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गंगाधर नंदेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन वसंत कदम यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.