प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कब्बडी स्पर्धांना सुरवात

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर कबड्डी स्पर्धांना सुरुवात झाली.

मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पुढील दोन दिवस होणार आहेत. या कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन उपायुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते आणि नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. गुरुवारी पहिल्या दिवशी पाणीपुरवठा विभाग विरुद्ध डास प्रतिबंधक ,  कर विभाग एक आणि अतिक्रमण विभाग , पाणीपुरवठा विभाग मिरज आणि सार्वजनिक आरोग्य विभाग अ , सार्वजनिक आरोग्य विभाग ब आणि कर विभाग दोन यांच्यामध्ये हे कब्बडीचे सामने झाले. या कबड्डी स्पर्धेतील उपांत्य व अंतिम सामने शनिवारी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सायंकाळी संपन्न होणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी सहाय्यक आयुक्त आणि कबड्डीपटू नितीन काका शिंदे, कबड्डीपटू सुहास व्हटकर,  महापालिकेचे क्रीडा अधिकारी महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमर निंबाळकर ,अतुल माने , पत्रकार शितल पाटील आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.