प्रतिष्ठा न्यूज

कामगार मंत्र्याच्या सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळात १५० कोटींचा घोटाळा : महेश खराडे यांचा आरोप; मंत्र्याच्या घरावर मोर्चाचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कामगार मंत्र्याच्या सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळा मध्ये सुमारे 100 ते 150 कोटीचा भ्रष्टाचार झाला असून भ्रष्टाचाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणारांवर कारवाई करावी, अन्यथा कामगार मंत्र्याच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
महेश खराडे म्हणाले, महामंडळाकडे नोंदणीकृत कामगारांना मिळणाऱ्या अनुदानातून 50 टक्के अनुदान हडप करण्याचा धंदा सुरू केला आहे. या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी व एजंट यांच्या संगनमताने हा घोटाळा सुरू आहे. महामंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगाराच्या विधवांना 2 लाख , घर बांधणीसाठी पाच लाख , मेडिकल खर्चासाठी 10 लाख रुपये, व्यावसायिक शिक्षणासाठी 60 हजार, महाविद्यालयीन शिक्षण 50 हजार, याशिवाय मध्यान भोजन आदीसह अन्य सुविधा दिल्या जातात. या सुविधा आणि अनुदान मिळवून दिले की त्यातील 50 ते 60 अनुदान एजंट हडप करत आहेत. वाळवा तालुक्यात सलीम सय्यद हा एजंट आणि त्याची संघटना असले उद्योग मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्याने हबिर निर्मळ या मजुराला 2 लाख अनुदान मिळवून दिले. आणि लगेच एक लाख त्याच्या खात्यावर वर्ग झाले. तांबवे आणि गावातील लाभा रत्यानी या बाबतीत सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत पुरावे सादर केले आहेत. मात्र कोणतीही कार्यवाही होत नाही. हे वास्तव आहे. या सर्व मंडळींना माजी मंत्र्याचा वरद हस्त आहे. त्यामुळे बिन बोभाट हा धंदा सुरू आहे. त्यामुळेच आज कामगार कार्यालयात जावून याबाबत विचारणा केली मात्र सहायक कामगार आयुक्त जागेवर नव्हते. सदर प्रकार बंद न झाल्यास कामगार आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकू, असाही इशारा देत आहोत.

लक्ष्मी महादेव निप्रुळ या विधवा महिलेला 2 लाख रुपये मिळाले त्यातील एक लाख रुपये सलीम सय्यद याच्या खात्यावर एक लाख तासात वर्ग झाले. असा आरोप महेश खराडे यांनी केला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.