प्रतिष्ठा न्यूज

वारिशे कुटुंबाला परिषदेची आर्थिक मदत जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई प्रतिनिधी : चळवळीत काम करणारया आणि जनहितासाठी सर्वस्वाचं बलिदान देणारया दिवंगत पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने फुल नाही फुलाची पाकळी या न्यायानं २१ हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली आहे.
शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारच गेला आहे.. अशा परिस्थितीत पत्रकार संघटना म्हणून कुटुंबीयांच्या पाठिशी उभे राहणे परिषदेला आपले कर्तव्य वाटते.. त्यामुळेच परिषदेने २१,००० रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. एस.एम.देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी लवकरच राजापूुरला जाऊन वारिशे कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यावेळी ही रक्कम त्यांच्या कुटुंबाला दिली जाणार असल्याचे परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.