प्रतिष्ठा न्यूज

शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन आर्थिक उन्नती साधावी: जिल्हाधिकारी- अभिजित राऊत

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : निसर्गाच्या अवकृपेने शेतीचे होत असलेले नुकसान याची चिंता न करता शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन आर्थिक उन्नती साधल्यास मार्ग निघतो व टोकाचे पाउल उचलत असलेल्या शेतकरी आत्महत्या थांबतील यासाठी शासन तुमच्या पाठीशी उभे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
दि.10 मे रोजी कापसी बु. येथे शासन “आपल्या दारी” या उपक्रमातर्गत शेतकरी मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.जिल्हाधिकारी ते बोलत होते.
पुढे बोलतांना मा. जिल्हाधिकारी म्हणाले की महिलांनी छोटे उद्योग चालवून कौटुंबिक विकास करावे व शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ घ्यावा तसेच शेतकरी महिलांनी स्वयं सहाय्यता समुहाचे सदस्य होऊन अर्थिक सक्षम झाले पाहिजे. हे सर्व आमलात आल्यास शेतकरी आत्महत्या थांबायला वेळ लागणार नाही असे ही ते म्हणाले.
यावेळी विचारपिठावर तहसिलदार- मा. व्यंकटेश मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी- रेखाताई काळम (कदम), तालुका कृषिअधिकारी- सदानंद पोटपेलवार, गटविकास अधिकारी- डि.आय.गायकवाड, नायब तहसिलदार- राम बोरगावकर, अशोक मोकले, कापशी च्या सरपंच- ललिता आळणे, उपसरपंच- शोभा वडवळे, विस्तार अधिकारी- डि.एल देशपांडे, मंडळाधिकारी- चंद्रशेखर सहारे, कृषी मडळ अधिकारी- टेकाळे आदीची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी रेखाताई काळम(कदम) मार्गदर्शन करताना म्हणाल्या की अनुभवातून शासनाच्या योजनांची माहिती घ्यावी तसेच एकाच ठिकाणी लाभ घेता यावा हा उद्देश गाव व प्रशासनाच्या चर्चेतून गावाचा विकास करावा केवळ अनुदानासाठी योजना न घेता आर्थिक विकास व्हावा म्हणून ही योजना राबवावी असे ही त्या म्हणाल्या.


यावेळी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचे 100 लाभार्थीना कार्यक्रमाच्या ठिकाणी धनादेश, शेती औजारे, ट्रॅक्टर, मतदान कार्ड, राशन कार्ड, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार- मा.व्यंकटेश मुंडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार गुणाजी कपाळे यांनी मानले. या कार्यक्रमाला मंडळातील सर्व गावचे शेतकरी, व सर्व विभातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व तलाठी सज्जाचे तलाठी यांनी मोठे परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.