प्रतिष्ठा न्यूज

तासगावात उद्या प्रभोदय दहीहंडीचा थरार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:‘बोल बजरंग बली की जय…’ या जयघोषाच्या साक्षीने उद्या शुक्रवारी दत्तमाळ तासगाव याठिकाणी सायंकाळी 6 वाजल्यापासून लाखमोलाच्या प्रभोदय दहीहंडींचा थरार तासगाव करांना अनुभवायला मिळणार आहे.  नृत्याविष्कारासह लेसर शो,पेपर ब्लास्ट,लाईट शो आणि डीजेच्या गजरात हा सोहळा सजणार आहे. यावेळी सुरक्षिततेच्या सर्व साधनांसह आपत्कालीन व्यवस्थाही सज्ज असणार आहे.डिजेचा ठेका,सुमधूर अशी गाणी,शिस्तबध्द नियोजन, फुलांनी सजविलेली दहीहंडी, तरुणाईच्या सन्मानाचा तसेच गोविंदा पथकासह उपस्थितांच्या सुरक्षेचा विचार करून दहीहंडी उभारण्यात आली असल्याचें भाजपाचें युवानेते प्रभाकर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.या सांस्कृतिक कार्यक्रमास महिला भगिनींसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून तासगावसह तालुक्यातील सर्वांनी या प्रभोदय दहीहंडी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.