प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई चालक रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेची कौशल्य चाचणी (ड्रायव्हींग टेस्ट) रद्द

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा पोलीस दलात १३ रिक्त पोलीस शिपाई चालक पदांकरीता एकूण ५६८ पुरुष व महिला उमेदवार शारिरीक व मैदानी चाचणीकरीता हजर राहिले होते. त्यापैकी ४१२ उमेदवारांना दि. २६/०६/२०२४ च दि. २७/०६/२०२४ या कालावधीत कौशल्य चाचणी (ड्रायव्हींग टेस्ट) साठी बोलाविण्यात आलेले उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांची इतर पोलीस घटकात पोलीस भरती प्रक्रियेमधील मैदानी चाचणी असल्यास सदर उमेदवारांना दि. २९/०६/२०२४ रोजी कौशल्य चाचणी (ड्रायव्हींग टेस्ट) देणेकरीता विश्वेश्वरैया टेक्निकल कॅम्पस, पाठगांव, मिरज येथे बोलविण्यात आले होते.
या तारखांना घेण्यात येणारी सदर कौशल्य चाचणी (ड्रायव्हींग टेस्ट) ही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली असून उमेदवारांना पूढील तारीख लवकरच कळविण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सांगली शाखा पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी प्रेस नोट द्वारा कळविले आहे. याबाबत अधिकृत माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.