प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती संभाजीनगर येथे 19 फेब्रुवारी पासून राज्यस्तरीय छत्रपती स्केटिंग ट्रॉफीचे आयोजन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :  रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर, रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती चषक स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आलेले आहे अशी माहिती राज्य रोलर रिले स्केटिंग असोसिएशनचे सचिव भिकन अंबे यांनी दिली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील जवळपास 350 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली असून, स्पर्धेतील मुला मुलींना रिले एक (100 मीटर) व रोड स्पीड रेस  (300 मीटर)अशा स्पर्धेला सामोरे जावे लागेल. रिले स्पर्धेत सर्व सहभागी स्पर्धकांना छत्रपती चषक तसेच प्रमाणपत्र दिले जातील. रोड स्पीड रेस प्रकारात पहिल्या तीन क्रमांकांना मेडल देण्यात येईल.
निवासी स्पर्धकांसाठी राहण्याची सोय करण्यात आलेली असून कोचेस साठी टी-शर्ट व मोमेंटो देण्यात येईल. राज्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांना ओव्हर ऑल चषक देण्यात येईल. स्पर्धेत वयोगट चार वर्षापासून ते सोळा वयोगटापर्यंत स्पर्धक कॉड फॅन्सी इन लाईन प्रोफेशनल इन लाईन बिगिनर या स्केटिंग प्रकारात सहभाग घेतील. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  पूजा आंबे, गणेश बनसोडे, पंकज बोरसे आदी प्रयत्नशील आहेत. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. मो. 9422203319 / 9168430000
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.