प्रतिष्ठा न्यूज

नायक – हरी थावरु राठोड यांचे निधन : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील फुलमळा तांडा- उमरा येथील जेष्ठ नागरिक तथा नायक असलेले हरी थावरु राठोड वय 85 वर्षे यांचे दि. 20 डिसेंबर 2023 रोज बुधवारी रात्री 8:45 वाजता दुःखद निधन झाले असून त्यांचे पार्थिवावर दि.21डिसेंबर रोजी दुपारी 2:00 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै.हरी राठोड (नायक) यांचे पश्चात- पत्नी, तीन मुले, चार मुली, सुना, नातू, पणतू, असा मोठा परिवार आहे.गेल्या 25 वर्षांपासून या तांड्यातील नायक म्हणून काम करतांना त्यांनी सामाजिक सलोखा ठेवत वादविवाद होऊ दिला नाही.त्यांचा निर्णय सर्वांना न्याय देणारा होता. ते माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब राठोड यांचे वडील तर ग्रामपंचायत सदस्य सतीश राठोड यांचे आजोबा होत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.