प्रतिष्ठा न्यूज

‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली अर्धनग्न आणि अश्लील छायाचित्रे प्रसारित करणार्‍या बॉलीवूड अभिनेत्रींविरूद्ध कारवाई करा ! – रणरागिणी

प्रतिष्ठा न्यूज  
सांगली प्रतिनिधी : सध्या भारतात ‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली ‘बॉलीवूड’मध्ये गरोदर असलेल्या अनेक अभिनेत्री त्यांची अर्धनग्न आणि अश्लील छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसारित करत आहेत
ही कृत्ये समाजातील सर्वसामान्य स्त्रियांमध्ये लज्जा निर्माण होईलअशी आहेतअभिनेत्री अनुष्का शर्माकरीना कपूरपासून ते बिपाशा बासूपर्यंत या अभिनेत्री गरोदरपणात वाढलेले पोट उघडे करून अंगप्रदर्शन करत आहेतभारतीय दंडसंहितेतील कलम 292 आणि 293 नुसार ‘अश्लीलतेचा प्रसार’ हा शिक्षापात्र गुन्हा आहेदंडसंहितेतील कलम 294 नुसार ‘सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृती करणे’ दंडास पात्र गुन्हा आहेत्यामुळे या अभिनेत्रींवरतसेच त्यांची छायाचित्रे प्रसारित करणार्‍या माध्यमांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या सौसंदीप मुंजाल यांनी केली आहे.

      रणरागिणी’च्या वतीने सौसंदीप मुंजाल यांनी प्रधानमंत्री मानरेंद्र मोदीकेंद्रीय गृहमंत्री माअमित शाहकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री माअनुराग ठाकूरमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री माएकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मादेवेंद्र फडणवीसराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा सुश्रीरेखा शर्मातसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहेया तक्रारीत म्हटले आहे की, ‘बेबी बंप फ्लाँटिंग’ असे नामकरण करत गरोदरपणात वाढलेले पोट उघडे ठेवून जगाला दाखवण्याचीत्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरून छायाचित्रे काढून अंगप्रदर्शन करण्याची जोरदार चुरसही या अभिनेत्रींमध्ये चालू आहेही कृत्ये सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर स्त्रीच्या मनात लज्जा निर्माण करणारे आणि समाजात सहजपणे वावरण्यास अडचणीचे ठरणारे आहे.

    वास्तविकतगर्भारपण हा स्त्रीच्या जीवनातील मातृत्वाच्या प्रवासाचाअत्यंत संवेदनशील आणि अत्यंत व्यक्तिगत असा काळ असतोमात्र बॉलीवूड अभिनेत्रींनी स्वत:च्या गरोदरपणाचा केवळ व्यावसायिक लाभासाठीप्रसिद्धीसाठी करत असलेले ओंगळवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीसाठी लज्जास्पद आहेहे व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली केले जात असलेतरी समाजहिताला बाधा पोहोचवणारे आहेयाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणू शकत नाही.

सौ. संदीप कौर-मुंजाल
समन्वयक, ‘रणरागिणी’ (हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा),
देहली. (संपर्क क्रमांक : 7011592831)
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.