प्रतिष्ठा न्यूज

मिरज कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

प्रतिष्ठा न्यूज  
मिरज प्रतिनिधी : दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या मिरजेतील कन्या महाविद्यालयात हॉकीपटू मेजर ध्यानचंद जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी काही योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. अँपेक्स योगा अँकॅडमी , सांगलीचे योग प्रशिक्षक अनिकेत म्हेत्रे व आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा योगपटू कु. अर्पिता पाटील यांनी ही प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर होते. कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सुनिता माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
          या कार्यक्रमाचे संयोजन  शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाने केले. प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक प्रा. बाबासाहेब सरगर यांनी केले. प्राचार्य डॉ. माळकर यांनी निरोगी आयुष्य जगायचे असेल तर खेळ व योगासनांची जोपासना करावी लागेल. खेळ शरीराला व मनाला नेहमी प्रसन्न ठेवतात. निरामय जीवन जगण्यासाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले. आभार क्रीडा शिक्षिका प्रा. भाग्यश्री कुंभारकर यांनी मानले. प्रा. रमेश कट्टीमणी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी  प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.