प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील पद्म.वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे आमदार खासदारांची भेट घेऊन साकडे घालणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गेल्या अनेक महिन्यांपासून सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील सोई सुविधांचा अभाव,औषधांचा तुटवडा, रुग्णांची होणारी हेळसांड, कर्मचाऱ्यांची रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांशी अरेरावेची भाषा,अपूरा कर्मचारी वर्ग,नादुरूस्त सीसीटीव्ही,या सर्वांकडे अधिष्ठात्यांचे होणारे दुर्लक्ष पाहता,शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची घरी आणि मंत्रालयात भेट घेऊन सर्व लेखाजोखा मांडला होता.
दरम्यान आता जिल्ह्यातील सर्व आमदारांसह खासदारांनी रुग्णांची अत्यावश्यक गरज आणि सर्वसामान्यांचा आधार असलेली सांगली मिरजेतील शासकीय रुग्णालय वाचावावीत.ती बंद पडू नयेत अथवा या रुग्णालयातही नांदेड सारखी घटना घडू नये यासाठी जातीने लक्ष घालून त्याचा वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा करून,ही दोन्ही शासकीय रुग्णालयं वाचवावीत या मागणीसाठी मनोज भिसे सर्व आमदार, खासदारांना पत्रे पाठवून तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती करण्याची मोहीम हाती घेऊन त्यांना साकडे घालणार आहेत.
लवकरच ही भेट मोहीम यशस्वी करून जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांचा आधारवड असलेले सिव्हिल हॉस्पिटल वाचवण्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी म्हटले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.