प्रतिष्ठा न्यूज

आरफळचा मुख्य कालवा फोडून बेकायदा बांधकाम.. तासगाव येथील प्रकार, अधिकाऱ्यांना पत्ताच नाही..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : येथील खोरी मळा भागात आरफळ पाणी योजनेचा मुख्य कॅनल फोडून बेकायदेशीर रित्या व विनापरवाना खोदला असून,या विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा पत्ताच नाही.या कॅनलला पाणी आल्यास ते शेतकऱ्यांच्या शेतीत घुसणार असून त्यांचे नुकसान होणार आहे.यासंबंधी मनसे नेते अमोल काळे यांनी सांगली पाटबंधारे विभागाला निवेदन दिले असून चौकशी करून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनात अमोल काळे यांनी म्हंटले आहे सँथोम स्कुल तासगाव यांनी तासगाव हद्दीतील आरफळ योजनेचा कालवा विनापरवाना मोठ्या प्रमाणात खोदला आहे.शासन नियमाप्रमाणे कालव्याच्या उजव्या बाजूस २२ फुट व डाव्या बाजूस १८ फुट कोणतेही खाजगी काम करू शकत नाही तरीही कालव्याच्या मध्यभागी बेकायेदेशीरपणे विनापरवाना खोद काम केले असून संबंधित शाळेचा कालवा खोदून त्याच्यावरती शाळेची खाजगी वाहने ये-जा करण्यासाठी बेकायदेशीरपणे पूल बांधण्याचा मानस असल्याचे निदर्शनास आले आहे.सध्या पाऊस सुरु असल्यामुळे कालव्याला केंव्हाही पाणी येण्याची शक्यता आहे.त्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून या विषयात आपण स्वतः गांभिर्याने लक्ष देऊन संबंधितावर तातडीने  गुन्हा दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.