प्रतिष्ठा न्यूज

तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील विकास कामांसाठी खासदारांच्या प्रयत्नातून तब्बल सहा कोटी दहा लाखांचा निधी मंजूर

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
 तासगाव : खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून तासगाव कवठेमहांकाळमधील शहर व ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी सहा कोटी दहा लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून खासदार संजय काका पाटील यांच्या विकास कामांची बॅटिंग अविरत चालू असल्याचे पुन्हा एकदा पहावयास मिळत आहे.याबाबतची अधिकृत घोषणा युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केली आहे.
याबाबत युवा नेते प्रभाकर पाटील म्हणाले की तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील तासगाव शहर कवठेमहांकाळ शहर तसेच तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात लोकांच्या अडीअडचणी समजावून घेत असताना खासदार संजयकाका पाटील व माझ्याकडे तेथील जनतेने विविध विकास कामांसाठी अडीअडचणी मांडल्या होत्या.त्यांना आपल्या राज्य सरकारकडून निधीची उपलब्धता करण्यासाठी शहरातील विकास कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथरावजी शिंदे व तासगाव व कवठेमहांकाळ ग्रामीण भागासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे पाठपुरावा करून तासगाव शहरासाठी नगर विकास विभागातून 2 कोटी रुपये,कवठेमहांकाळ शहरातील विकास कामांसाठी नगर विकास विभागाकडून 2 कोटी,तसेच तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी कुशल विकास कामे अंतर्गत (मनरेगा) अनुक्रमे एक कोटी व एक कोटी दहा लाख रुपये विविध गावांमध्ये विकास कामांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.लवकरच निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.याबाबत विविध गावातील जनतेने खासदार संजय काका पाटील यांचे आभार मानले आहेत,यापुढेही विकास कामांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही युवा नेते प्रभाकरबाबा पाटील यांनी दिली आहे.तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागासाठी आणखी अधिकचा निधी मंजूर करण्यासाठी मी व खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत लवकरच त्यास यश येईल व विकास कामासाठी अधिकचा निधी उपलब्ध होईल असा आशावाद युवा नेते प्रभाकरबाबा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.