प्रतिष्ठा न्यूज

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त परशुराम विद्यालयात रांगोळी स्पर्धा संपन्न : गटविकास अधिकारी माधुरी परीट यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने गगनबावडा येथील परशुराम विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज मध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आणि नाना तर्‍हेच्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. यावेळी गगनबावडा पंचायत समिती गटविकास अधिकारी माधुरी परीट व केंद्रप्रमुख गांगुर्डे साहेब . यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळ्या पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी जवळपास वीस विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. रांगोळी स्पर्धेचे नियोजन खोराटे
यांनी केले यावेळी प्राचार्य गोसावी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.