प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत 14 जूनला होणार मराठा उद्योजक परिषद : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठा समाजाचा सर्वांगीण म्हणजेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक विकास व्हावा. मराठा समाजाला शासकीय योजनाचा फायदा मिळावा. विविध विकासाच्या योजना राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात तसेच मराठा समाजाचा आर्थिक विकास व्हावा म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व मराठा स्वराज्य संघाच्या वतीने 14 जूनला वार बुधवार अनंत साई,स्वर्गीय खासदार डी जी पाटील इस्टेट, दक्षिण शिवाजीनगर,चांदणी चौक सांगली या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील तरुण होतकरू सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उभा करणाऱ्या उद्योजकांसाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्याकडून विविध योजनांची माहिती मिळणार आहे. तसेच बँकांकडून नवउद्योजकाना कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करतात यावरही चर्चा केली जाईल बँका आणि लघुउद्योग यांच्यामार्फत विविध योजनांच्या सविस्तर माहिती यामध्ये मिळणार आहेत तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून दहा लाखापासून पन्नास लाखापर्यंत बँकेच्या सक्षम अधिकारीच्या मान्यतेने नवीन होतकरू उद्योजकांना त्रास न होता बँकेतून लोन कसे उपलब्ध होईल याची सविस्तर माहिती बँक अधिकाऱ्याकडून मिळेल ,तरी या मराठा उद्योजक परिषदेसाठी सांगली शहरातील व सांगली जिल्ह्यातील नवीन होतकरू उद्योजक तयार होणाऱ्या सर्वजणाने एक्सपोर्ट इम्पोर्ट व झिरो पासून सुरुवात केलेली उद्योगाची आपल्या अनुभवातून माहिती देणारे यशस्वी उद्योजक या ठिकाणी येणार आहेत तरी या संधीचा लाभ घ्यावा अशी माहिती मराठा स्वराज्या संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी पत्रकार बैठकीमध्ये आव्हान केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.