प्रतिष्ठा न्यूज

समाजातील ग्राहक जागृती ही काळाची गरज : राज्य सचिव अरुण वाघमारे

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
कोल्हापूर,ता.१४ : समाज बदलासाठी अनेक व्यक्ती आणि संस्था यांचे फार मोठे योगदान असते.  अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक बदलासाठी, जागृतीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. तसेच ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे,संवर्धन करणे, तसेच त्यांच्या तक्रारीचे सुलभतेने, विना विलंब आणि अल्पखर्चात निवारण करणे, हा ग्राहक संरक्षण कायद्याचा मूळ उद्देश आहे, दैनंदिन व्यवहारात भेसळयुक्त माल मिळणे, कमी प्रतीचा माल मिळणे, वजनमापात फसवणूक करणे,छापील किमतीपेक्षा कमी किंवा जास्त किंमत आकारणे याकरिता सजग ग्राहक बना,  संस्थेचे सभासद बना, ग्राहक चळवळ सुदृढ करा. असे तळमळीचे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्यसचिव अरुण वाघमारे यांनी कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स येथील सभागृहात ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या आढावा बैठकीत केले. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष बी. जे.पाटील होते.

यावेळी संस्थेचे राज्य सदस्य एस एन पाटील, पुणे संघटक सुनिताताई राजे घाडगे, जिल्हा अध्यक्ष विजय पाटील संघटक सुरेश माने यांनी आपले विचार मांडले.
जिल्ह्यातून आलेल्या सर्व शाखा अध्यक्षांनी आपले मनोगते व्यक्त केली.
सूत्रसंचालन व आभार कोल्हापूर महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस यांनी केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा सचिव दादासो शेलार, दीप्ती कदम, प्रज्ञा यादव, अरुण साळुंखे, दास सर, संजय शिरदवाडे, विजय पाटील, आंबी सर, दादा मोरे, वैष्णवी गुरव,बाजीराव कदम, विष्णू पाटील, तुकाराम पडवळ, पुनम देसाई,संजय पवार, सांगलीचे आलम शहा मोमीन,डॉ. विद्याधर आदी हजर होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.