प्रतिष्ठा न्यूज

संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली महापालिका क्षेत्रात प्रभाग निहाय मॅरेथॉन बैठकांचे नियोजन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात प्रभाग निहाय मॅरेथॉन बैठका घेण्यात येणार आहेत. भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वय शेखर इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या सांगली शहर जिल्हा कमिटीची बैठक झाली.
बैठकीस शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, विश्वजीत पाटील, भारती दिगडे, गीतांजली ढेपे पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रविण जाधव, रविंद्र सदामते, रविंद्र ढगे, विक्रम सावर्डेकर, सुजित काटे, अर्जून मजले, किसान मोर्चा शहराध्यक्ष जयवंत पाटील, राजेंद्र आवटी, दिपक कर्वे, लालसिंग देशमुख, अब्राहम मोरे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष इम्रान शेख, जाफर मुजावर यांच्या सह विविध विभागाचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रात प्रभाग निहाय मॅरेथॉन बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकांच्या तारखा आज निश्चित करण्यात आल्या. शेखर इनामदार यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. सर्व कार्यकर्ते, नगरसेवक आणि नेते यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी सुचना देण्यात आल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.