प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेजचा पहिला पदवीदान समारंभ उत्स्फूर्तपणे साजरा; वास्तव जगात जबाबदारी व नैतिकता पाळा – डॉ. शिवाजीराव कदम

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : साडेचार वर्ष पालक व शिक्षकांच्या मदतीने अभ्यास करून डॉक्टर पदवी मिळाली. आता तुमची जबाबदारी वाढली आहे. रूग्ण हे दैवत समजून त्यांच्या आरोग्य रक्षणासाठी सेवाभावी वृत्तीने काम करून सन्मान मिळवा. कोरोना काळात डॉक्टर व वैज्ञानिकांनी केलेल्या कामामुळेच देश संकटातून बाहेर पडला आहे. होमिओपॅथिचा अभ्यास व ज्ञान प्रत्यक्षात जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी उपयोगात आणा. प्रॅक्टिस करताना जबाबदारी व नैतिकतेचे  पालन करून मानवता जपा असे प्रतिपादन भारती अभिमत  विद्यापिठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी केले.

आज मिरजेत गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या पहिल्या दिक्षांत संमारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सन्मानित अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

प्रारंभी पदवी पोषाखात पदवी धारक डॉक्टरांची मिरवणूक व महाविद्यालयाचा ध्वज यांचे समांरंभ स्थळी सन्मानपूर्वक आगमन झाले. प्रमुख अतिथीच्या परवानगीने प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे यांनी पदवीदान समारंभ प्रारंभाची उद्घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या गीताचे गायन झाले. होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमन व सहकार तपस्वी माजी खासदार गुलाबराव पाटील यांच्या प्रमिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले.

डॉ. राजेंद्र मेथे यांनी स्वागत केले. प्रमुख अतिथी डॉ. शिवाजीराव कदम व सिनेट मेंबर डॉ. भालचंद्र ठाकरे यांचा परिचय प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी करून दिला. तदनंतर मान्यवर पाहुणे व विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वस्त विरेंद्र पाटील यांचा खास सन्मान डॉ. कदम यांनी केला.

हनिमन प्रतिज्ञेनंतर पदवी वितरण डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. 2016-17 या वर्षात प्रवेश घेऊन होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 81 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी डॉ. भालचंद्र ठाकरे म्हणाले, होमिओपॅथी क्षेत्रात व विद्यापीठ सिनेट मेंबर म्हणून आमच्या कार्याचे श्रेय पृथ्वीराज पाटील यांच्या कडे जाते असे सांगून पदवी धारकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले, संस्थेच्या व मेडिकल कॉलेजच्या प्रगतीत माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोठे आहे. त्यांच्या ऋणातून अंशतः  उतराई होण्यासाठी डॉ. पतंगराव कदम खुले सभागृह असे संस्थेच्या खुल्या सभागृहाचे नामकरण केले आहे. पदवीदान समांरभ हा डॉ. शिवाजीराव कदम यांच्याच हस्ते करायचा असा निर्णय घेतला. हा कॉलेजच्या कॅम्पस मधील पहिला दिक्षांत संमारंभ आहे. डॉ. कदम हे माझे गुरू आहेत. माझ्या हस्ते गुरूंचा व गुरूंच्या हस्ते माझा सत्कार हा अनमोल ठेवा आहे.

7 विद्यार्थी, 4 शिक्षक व 6 शिक्षकेत्तर कर्मचारी यावर सुरू केलेल्या संस्थेत आज विविध शाखातून 5000 हून अधिक विद्यार्थी शिकतात. 300 हून अधिक शिक्षक व 150 हून अधिक शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. डॉ. शिवाजीराव कदमांनी भारती विद्यापिठ मोठे करण्यासाठी स्व. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे काम केले आहे. आजचा पहिला पदवीदान समारंभ 81 विद्यार्थ्यांच्या जिवनातील सर्वोत्कृष्ट क्षण आहे. स्व. गुलाबराव पाटील यांच्या सहकार व ग्रामीण विकास क्षेत्रातील प्रचंड मोठया कार्याचा वारसा पूढे नेण्यासाठी त्यांच्या नांवे ट्रस्ट स्थापन करून शैक्षणिक कार्याचा विस्तार केला आहे. या कामी संस्थेचे ट्रस्टी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक यांचे सहकार्य मोलाचे आहे.

डॉ. कदम म्हणाले, ‘स्व. गुलाबराव पाटील यांचे सहकारातून ग्रामीण विकासाचे काम फार मोठे आहे. त्यांचे पुत्र पृथ्वीराज आज विविध क्षेत्रात काम करत आहेत. संस्थेचे काम उत्कृष्ट आहे. गुणवत्ता चांगली आहे. पृथ्वीराज व विरेंद्र यांनी परिश्रम पूर्वक संस्थेची प्रगती करुन बहुजन समाज शिक्षणात मोलाचे योगदान दिले आहे . यांच्या मुळेच आज तुम्हाला डॉक्टर पदवी मिळत आहे. कोठून आलो, काय मिळवलं आणि आपलं उत्तरदायित्व काय याचं चितंन करा. आदर्श डॉक्टर्स बना प्रमुख अतिथीच्या परवानगीने डॉ. राजेंद्र मेथे यांनी पदवीदान समारंभ समाप्तीची उद्घोषणा केली. समारंभा चे समन्वयक प्रा. डॉ. प्रताप भोसले यांनी आभार मानले.

दुस-या सत्रात डॉ. जिनेश्वर यलीगोंडा, डॉ. भालचंद्र ठाकरे, डॉ. इकबाल तांबोळी व विभाग प्रमुखांच्या हस्ते उर्वरित विद्यार्थ्यानां पदव्यांचे वितरण केले. शेवटी डॉ. प्रताप भोसले यांनी आभार मानले. त्यांनतर समुह छायाचित्रण होऊन कार्यक्रमांची सांगता झाली. या पदवीदान समारंभास संस्थेचे विश्वस्त शंकर तावदारे, डॉ. इक्बाल तांबोळी, विरेंद्रसिंह पाटील, डॉ. भालचंद्र ठाकरे, प्राचार्य डी. डी. कणसे, प्राचार्य डी. डी. चौगुले, संस्थेच्या विविध शाखांचा व मेडिकल कॉलेजचा स्टाफ, पदवी प्राप्त विद्यार्थी, त्यांचे पालक व हितचिंतक मोठया संख्येंने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.