सांगलीमध्ये होणार वैशिष्ट्यपूर्ण रुग्ण अधिकार परिषद
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : आरोग्य हक्क समिती सांगली आयोजित रुग्ण अधिकार परिषदेचे आयोजन गुरुवार दि. १६ फेब्रुवारी दुपारी ०२:००.वाजता मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन सिव्हिल हॉस्पिटल मागे गारपीर समोरील रोड सांगली येथे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट नियम २०२१ नुसार महापालिका क्षेत्रातील खाजगी हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल व धर्मादाय हॉस्पिटल यांच्या सद्यस्थितीच्या सर्वेक्षणाची पाहणी अहवाल व रुग्णांचे अधिकार तसेच डॉक्टरांवरील हल्ले व हिंसेच्या विरोधात सदर परिषदेमध्ये मार्गदर्शन होणार आहे. परिषदे करिता साथी संस्था पुणे चे डॉ. अभय शुक्ला, शकुंतला भालेराव, विनोद शेंडे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक महापौर दिग्विजय सूर्यवंशी प्रमुख पाहुणे आयुक्त सुनील पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंके उपस्थित राहणार आहेत. तरी सदर परिषदेत आरोग्य हक्क समिती सांगली यांचे अध्यक्ष शाहीन शेख यांनी “आपला रुग्ण आपले अधिकार” जाणून घेण्यासाठी सांगलीकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.