प्रतिष्ठा न्यूज

राज्य परिवहन प्राधिकरणने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास तक्रार करा – सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पी.व्ही. साळी

प्रतिष्ठा न्यूज 

सांगली प्रतिनिधी : राज्य परिवहन प्राधिकरणने दिपावली सणानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दरपत्रक ठरवून दिलेले आहे. खाजगी बस वाहतूकदाराने या दराच्या 50 टक्के अधिक (दिडपट) आकारणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  खाजगी वाहतूकदारानी राज्य परिवहन प्राधिकरणने ठरवून दिलेल्या दराच्या दिडपट पेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्याकडे 9209502036 या व्हॉटसअॅप क्रमांकावर तसेच dyrto.10-mh@gov.in या ईमेल आयडीवर प्रवाशांचे संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक, प्रवास कोठून कोठे केला, बस क्रमांक, वाहनांचे व प्रवाशांच्या भाडे आकारणी तिकीट यांच्या छायाचित्रासह तक्रार नोंदविता येईल. तक्रारीची शहानिशा करून मोटार वाहन कायद्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

दिपावली सणानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दरपत्रक पुढीलप्रमाणे असून प्रवासाचा मार्ग व तिकीट दर प्रति प्रवासी रूपयामध्ये अनुक्रमे निमआराम आसनव्यवस्था (नॉन ए. सी. सिटर), वातानुकुलित आसनव्यवस्था (ए.सी. सेंटर) व वातानुकुलित शयनयान (ए.सी. स्लीपर) निहाय पुढीलप्रमाणे. सांगली ते मुंबई – 946, 990, 1067. मिरज ते मुंबई – 979, 1017, 1100. शिराळा ते मुंबई – 891, 929, 1001. सांगली ते पुणे – 544, 566, 616. मिरज ते पुणे – 562, 599, 649. सांगली ते सोलापूर – 500, 522, 566. मिरज ते सोलापूर – 473, 495,533. सांगली ते नाशिक – 1089, 1138, 1232. सांगली ते औरंगाबाद – 1149, 1199, 1292.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.