प्रतिष्ठा न्यूज

तासगावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची महादौड उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : देव, देश,धर्म रक्षणासाठी गेली नऊ दिवस सुरु असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या श्री दुर्गामाता दौडीची आज हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत महादौडीने सांगता झाली.या दुर्गामाता महा दौडीचे विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सकाळी शिवतीर्थावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा करून आरती होऊन ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र झाल्यानंतर या महादौडीस प्रारंभ झाला.पारंपारिक वाद्यांच्या गजरात भगवा ध्वज घेऊन हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत निघालेल्या दौडीचे पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजीत अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले.रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी काढून स्वागत करून महिलांनी भगव्या ध्वजाचे पूजन करून पंचारतीने औक्षण केले. आजच्या या महादौडीत लहान मुले, तरुण,जेष्ठ धारकरी,तरुणीसह,महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय,हिंदू धर्म की जय,जय श्रीराम, भारत माता की जय,अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी प्रत्येक धारकरी डोक्यावर भगवा फेटा,भगवी पांढरी टोपी आणि कपाळी भगवा टिळा लावून सहभागी झाला होता.देव देश धर्म रक्षणाच्या, राष्ट्राच्या, संस्कृतीच्या, सत्व स्वाभिमामानाच्या संदर्भात निद्रिस्त होत चाललेल्या हिंदू समाजाने खडबडून जागे व्हावे यासाठी केलेला अट्टाहास म्हणजेच श्री दुर्गामाता दौड आहे,या भावनेने शहरातील लहान, थॊर, महिला भगिनीं,तरुण धारकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.भारत मातेच्या रक्षणासाठी, कठीबद्ध असणारी शिवशंभु रक्तगटाची आणि राष्ट्र भक्तांची तरुण पिढी घरोघरी तयार व्हावी या उद्देशाने श्री भिडे गुरुजी यांनी या श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात केली आहे.
या वर्षी पहिल्यांदाच महादौडीच्या ध्वजाचा मानकरी कोण असेल यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तासगाव मधील धारकऱ्यांनी श्री शिव प्रभू दौड चे आयोजन केले होते,सदरची शिवप्रभू दौड पाच किलोमीटरची होती.या दौडमध्ये एकूण 25 जणांनी सहभाग घेतला होता यामध्ये पहिले तीन क्रमांक काढण्यात आले.प्रथम क्रमांक रितेश सुनील गायकवाड,याने पटकावला तर द्वितीय क्रमांक अवघ्या बारा वर्षाचा चिमुरडा प्रज्वल दिलीप माळी याने पटकावला,तर तृतीय क्रमांक प्रणव नरेंद्र जाधव याने पटकावला.महादौड संपल्या नंतर मान्यवरांच्या हस्ते पहिल्या तीन क्रमांकांना चांदीचे कडे भेट देण्यात आले.सहभागी इतरांना सर्टिफिकेट देण्यात आली.इथून पुढे प्रत्येक वर्षी श्री शिव प्रभू दौड होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.