प्रतिष्ठा न्यूज

वाहनांच्या व्दारे धूर फवारणी बंद करून लहान हाती घेऊन जाता येणार धूर फवारणी मशीन व्दारे धूर फवारणी करण्याचा सांगली महापालिकेचा निर्णय : तज्ज्ञांची बैठक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी महापालिका क्षेत्रातील डास प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना बाबत तज्ञांची मते जाणून घेऊन डास प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभाविपणे उपाययोजना करण्यासाठी नियोजन करताना कोणतीही बाब कमी राहू नये या करिता चर्चा सत्र आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या नुसार सागली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील डेंग्यु, चिकुनगुनिया या सारख्या किटकजन्य आजार वरती प्रतीबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना बाबत चर्चासत्र दि ०६/०३/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. वसंतरावदादा पाटील सभागृह मनपा मुख्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांच्या उप आयुक्त स्मूर्ती पाटील ,वैभव साबळे ,पंडित पाटील , यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले ,डॉ. योगेश साळे, सह, संचालकह त्तीरोग, हिवताप किटकजन्य आजार, डी.डी. ऑफिस कोल्हापुर यांनी डास उत्पत्ती आणि प्रतिबंध उपाययोजना बाबत सविस्तरपणे माहिती दिली आहे, डास मारणे ही अडचणी गोष्ट असून डासांची घनता कमी करू शकतो, डासांचे अनेक प्रकार असून त्या पैकी अनफिलीस डास हा रात्री चावतो, क्युरिक्स हा कुबड काढून बसणारा आणि झाडीत आणि घाण पाण्यात वाढणारा डास आहे ,टायगर डास हा दिवसा चावतो , झीका डास असे प्रकार महत्त्वाचे आहे.

डेंग्यू निर्माण करणारा डास हा किती घातक स्वरूपाचा या वर बोलताना डॉ साळे यांनी सांगितलेअसे डास त्यांच्या पुढील पिडी देखील दूषित करतात, त्या मुळे अनेक दूषित डास पैदास होते, त्यावर प्रभावी उपाय म्हणजे घरामध्ये धूर फवारणी करावी लागेल, ते केले तरच डास कमी होणार आहे, त्याच बरोबर पाणी साठवून करण्यासाठी असलेले बॅरेल किंवा अन्य भाडे साठवणूक होणार आहे सर्व ठिकाणे आठवड्यात एक दिवस रिकामे करून , ड्राय डे म्हणून पाळणे आवश्यक आहे, जळके ऑइल हे देखील साठलेले पाण्यावर टाकले तरी डास प्रतिबंध करणे शक्य होणार, हे सामुदायीक प्रयन्त केले तर डास प्रतिबंध होणे गरजेचे आहे, सर्वांनी करावयाचे प्रयन्त म्हणून सायंकाळी डास घरात प्रवेश करू नये या साठी दार बंद करून प्रतिबंध करू शकतो,
झिका हा डास अंत्यत घातक स्वरूपाचा असून गरोदर माते पासून येणाऱ्या बाळास मेंदूच्या गंभीर आजार होऊ शकतो, त्या मुळे कुटूंबाच्या पासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
डॉ प्रिया प्रभू , जिल्हा रुग्णालय मिरज , यांनी किटकजन्य आजार प्रतिबंधक उपाय म्हणून काय करता येईल यावर बोलताना महापालिका सर्व प्रतिबंध उपाय करत असतात त्या बरोबर नागरिकांनी आपल्या कुटूंबाच्या आरोग्यासाठी डास प्रतिबंध उपाययोजनाच्या अमलबजावणी करण्यासाठी प्रयन्त केलं तर डास प्रतिबंध करणे शक्य होईल
यावेळी सदर चर्चा सत्रास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती, माजी नगरसेवक विष्णू माने, सविता मदने , माजी महापौर संगीता खोत , वि द बर्वे अनेक संस्थेचे सदस्य , अध्यक्ष पदाधिकारी डॉ. विजय सिंह कदम.
सिव्हील सर्जन पद्मभूषण वसंतरावदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली. डॉ. योगेश वाघ, छाती रोग तज्ञ (पलमोनोलॉजीस्ट), डॉ. बी.आर. चव्हाण सेवा निवृत्त उपसंचालक, डॉ. विनोद परमशेट्टे MD (Med), डॉ,अनिल मडके श्वास हास्पिटल ,सांगली, इत्यादींनी आपले मते मांडली.
या चर्चा सत्रासाठी खालील मान्यवरांना देखील निमंत्रीत केले होते. रियाज मुजावर (कारडीओलॉजिस्ट),
डॉ. ससे IMA President (न्यूरोलॉजिस्ट), डॉ. शेखर करमरकर (जनरल प्रॅक्टीशनर असोसीयशन), डॉ. दिलीप पटवर्धन जीवन विद्या मिशन (आय स्पेशालीस्ट सायली देशपांडे पृथ्वी झीरो वेस्ट फाऊडेंशन निसर्ग संवाद फाऊडेंशन, डॉ. तगारे माती वाचवा फाऊडेशन मिनाक्षी कोळी मॅडम सेवा सदन ट्रस्ट, डॉ. रतन पाटील रेड डॉट मूहमेन्ट फाऊडेशन, कविता मगदुम इनर व्हील क्लब, सुशांत निकम डॉलफीन फाऊडेशन, डॉ. हर्षद दिवेकर…

सर्व चर्चा अंती वाहनांच्या व्दारे धूर फवारणी करणे या पुढे बंद करून लहान हाती घेऊन जाता येणार धूर फवारणी मशीन व्दारे प्रादुर्भाव झाल्या ठिकाणी आणि घरात व आवश्यकता नुसार परिसरात धूर फवारणी करावी या मता वर सर्वांचे एक मत झाले असून वरील पद्धतीने धूर फवारणी केल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपयांची बचत होणार असून त्या नुसार महापालिका प्रशासनाने नियोजन करण्यात येणार असल्याचे उप आयुक्त वैभव साबळे यांनी सांगितले आहे.
सदर चर्चा सत्राचे नियोजन डॉ. वैभव पाटील आणि डॉ रवींद्र ताटे यांनी त्यांच्या टीमने केले होते

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.