प्रतिष्ठा न्यूज

दरारा या सामाजिक संस्थेच्या वतीने नूतन आयुक्त माननीय सुनील पवार यांचे केले स्वागत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : नेहमी वादात सापडलेले व कायम नागरिकांशी उद्धट वागणारे व ज्या वेळेला त्यांची सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतून बदली झाली त्यावेळेला लोकांनी आनंदाने पेढे वाटून, ढोल ताशे, वाजवून त्यांचा निषेध व्यक्त केला होता ते आयुक्त नितीन कापडणीस यांच्या बदलीनंतर नवीन नवनिर्वाचित व नुकतेच पदभार स्वीकारलेले यांच्यात आम्हाला आयपीएस तडफदार व धडाकेबाज अधिकारी माननीय तुकाराम मुंडे साहेब यांचे प्रतिबिंब दिसते ते अधिकारी आयुक्त माननीय सुनील पवार साहेब. यांचा दरारा संघटनेचे अध्यक्ष व मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी त्यांना गुच्छ देऊन त्याचे स्वागत केले
सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्त पदी पदभार आपण स्वीकारल्याबद्दल तमाम सांगलीच्या जनतेच्या वतीने आपले सहर्ष स्वागत आहे व महापालिकेचा कारभार आपण पारदर्शकता करून सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरांचा विकासला हातभार लागेल अशी आशा व्यक्त केली व आपण तसे करावे अशी माननीय संतोष पाटील म्हणाले दरारा या सामाजिक संस्थेतर्फे व तमाम सांगलीकर जनतेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असे म्हणून त्यांना गुच्छ दिला गेला या वेळेला अनमोल पाटील, धनंजय खाडीलकर. चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्रीराम सासणे ,उपाध्यक्ष विनोद तिवडे, सचिव प्रकाश कांबळे, खजिनदार विनायक मोठे, कार्याध्यक्ष रामचंद्र कांबळे, सदस्य सुभाष कांबळे, दयानंद आळंतेकर,अनिल मोहिते ,सुनील मोहिते ,राजू सव्वाशे ,संजय खाडे व इतर पदाधिकारी उपस्थित राहून आयुक्त माननीय सुनील पवार साहेब यांचं स्वागत केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.