प्रतिष्ठा न्यूज

नांदेड: मराठा आरक्षण उपोषणकर्ते श्री दत्ता पाटील हडसणीकर यांच्यांशी मुख्यमंत्री ना.शिंदे यांनी साधला दूरक्षेत्र प्रणाली द्वारे संवाद; माजी मुख्यमंत्री ना.चव्हाण,खा.हेमंत पाटील यांचा पुढाकार

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : दत्ता पाटील हडसणीकर हे गेल्या 14 दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गांमधून आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यासाठी हादगाव तालुक्यातील हडसणी येथे बेमुदत उपोषणाला बसले होते त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना प्रशासनाने नांदेडच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविले आहे. सरकारने या उपोषणाची दखल घेतली असून आज दिनांक 18 रोजी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष श्री दत्ता पाटील यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचे वचन दिले. तसेच आपण उपोषण मागे घ्यावे. आपण प्रत्यक्ष येऊन मंत्रालयामध्ये भेटावे असे आवाहन त्यांनी यांनी केले. आणि आपले सोबत राहिलात तर आपल्याला आरक्षण तात्काळ देता येईल. अशी समजूत काढून त्यांना उपोषण मागे घेण्यास घेण्याची विनंती केली.

श्री दत्ता पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री नामदार श्री अशोकराव चव्हाण यांनी विधानसभेचे अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. तसेच शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला.

दरम्यान  पाटील यांनी मराठा समाजाला मागण्या आरक्षण द्यावे मागण्या पूर्ण  करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हदगाव तामसा सोमवारी कडकडीत बंद ठेवण्यात आला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.