प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगड मध्ये “गव्हर्मेंट जॉब अपॉर्च्युनिटीज फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स अँड रोड सेफ्टी” या विषयावर व्याख्यान संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. राजकुमार देशमुख असिस्टंट मोटार वेहिकल इन्स्पेक्टर सोलापूर यांचे “गव्हर्मेंट जॉब अपॉर्च्युनिटीज फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स अँड रोड सेफ्टी” या विषयावर व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
यावेळी डॉ. राजकुमार देशमुख यांचे मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रा. अतुल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
डॉ. राजकुमार देशमुख मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या विविध शासकीय नोकरीच्या संधी व इतर संधी जसे की ए एम व्ही आय, एम व्ही आय आणि ए आर टी ओ तसेच आरटीओ या क्षेत्राबद्दल विस्तृत माहिती दिली. शासकीय नोकऱ्यांची अभ्यासाची तयारी विद्यार्थ्यांनी नेमकी कशा पद्धतीने करावी याचीही माहिती दिली. स्पार्धा परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात याबाबतीत माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. धनंजय गिराम, प्रा. समाधान माळी, प्रा. राहूल शिंदे, धनाजी केवटे सह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.