प्रतिष्ठा न्यूज

पलूसकर माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव विविध उपक्रमांनी उत्साही वातावरणात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
पलूस प्रतिनिधी : पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय पलूस या ठिकाणी इयत्ता पाचवीतील नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ,शाळा प्रवेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्वागत समारंभासाठी संचालक सुनील रावळ, संजय परांजपे , मुख्याध्यापक तानाजी करांडे ,सुनील सरोदे,डॉ. दीपक सूर्यवंशी सर्व शिक्षक ,शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. या अनोख्या स्वागताने मुलांसह मान्यवर देखील भारावून गेले. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत करण्यासाठी परिसरामध्ये सर्वत्र सजावट केली.आकर्षक रांगोळी,फुलांची आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. .मुलांचे औक्षण करत साखर,,गुलाबपुष्प देऊन सनईच्या सुमधुर आवाजात स्वागत केले .यावेळी. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे देखील वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले नूतन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक संदीप सावंत यांनी शालेय शिस्तीबाबत मौलिक सूचना दिल्या.
शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माननीय उदय परांजपे, उपाध्यक्ष विश्वास रावळ ,सचिव जयंतीलाल शहा, यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वागत सुनील पुदाले, प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख बळीराम पोतदार, आभार इतिहास विभाग प्रमुख बाळासाहेब चोपडे यांनी मांनले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.