प्रतिष्ठा न्यूज

काँग्रेस भवन येथे गुलाबराव पाटील यांना आदरांजली

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी खासदार, सरकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील साहेब यांच्या 34 व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे माजी जिल्हाध्यक्ष आपसाहेब पाटील, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिंपुगडे साहेब यांनी कार्यकतृत्वचा आढावा मांडला यामध्ये प्रामुख्यांने गुलाबराव पाटील साहेब यांनी राज्यसभेवर बारा वर्षे खासदार म्हणून उत्कृष्ट काम केले. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतही सहा वर्षे एक अभ्यासू आमदार व उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची ख्याती होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. संजय गांधी निराधार योजनेचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा होता.
यावेळी महाराष्ट प्रदेश शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी सहकारी दूध संस्था ते सहकारातील कर्मचारी प्रशिक्षण आणि देश पातळीवर या प्रशिक्षणाचे अनुकरण अशी त्यांची वैभवशाली कामगिरी होती. महाराष्ट्राच्या सहकार व शेती क्षेत्राला ती वरदान ठरली. असे गुलाबराव पाटील साहेबांचे कार्य आजच्या पिढीला माहिती करून दिली. यावेळी ऋतुराज पाटील, अजित ढोले, पैगंबर शेख, सुरेष पट्टणशेट्टी, नाना घोरपडे, रविंद्र वळवडे, नासीर चौगुले, महावीर पाटील, अशोक रासकर, प्रषांत देषमुख, राजेंद्र कांबळे, बाबगोंडा पाटील, अरूण पडसुळे, आशिष चौैधरी, जन्नत नायकवडी, जमन नायकवडी, श्रीधर बारटक्के उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे आभार पैंगबर शेख यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.