प्रतिष्ठा न्यूज

नेहरूनगरच्या नंदीवाले समाजाच्या लोकांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव: नेहरूनगर येथील नंदीवाले समाजाच्या १५० ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना अखिल भारतीय राज्य नंदिवाले समाज संघटनेतर्फे जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील,निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील,तुरचीचे सरपंच व सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष विकास डावरे,माजी सरपंच सदाशिव खरात,माजी उपसरपंच पंडित पाटील,बालाजी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले,पलूस तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मोकाशी, राज्य कमिटी उपाध्यक्ष अण्णा पवार, सांगली जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब भास्कर देशमुख,बांधकाम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष महादेव जाधव, रामलिंग मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल्यांचे वाटप करण्यात आले.समाज मंदिरासमोर झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राज्याचे अध्यक्ष सर्जेराव वसंत देशमुख यांनी केले.दाखले काढताना आलेल्या अडचणींवर मात करून दाखले मिळवल्याचे त्यांनी सांगितले.जास्तीत जास्त समाजाच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बोलताना निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील म्हणाले कधीकाळी उपेक्षित असलेल्या नंदीवाले समाजातील तरुणांनी शैक्षणिक, सामाजिक राजकीय,सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचे दाखले असणे आवश्यक आहे.सर्वांनी आपापले दाखले काढून घ्यावेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील म्हणाले नंदीवाले समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच सहकार्य राहील.पलूस तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मोकाशी यांनी समाजातील मुलांनी शिक्षण , नोकरी याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.नंदीवाले समाजाच्या वतीने राज्याचे अध्यक्ष सर्जेराव  देशमुख यांचा यथोचित  सत्कार करण्यात आला.अनिल वाडकर सावर्डे यांनी सूत्रसंचलन केले.
यावेळी अंकुश भोसले,भास्कर देशमुख,दिलीप भोसले,रामजी देशमुख,बाबुराव देशमुख, वसंत भोसले,दीपक भोसले,सूर्यकांत भोसले,वसंत देशमुख,हरिबा देशमुख, अधिक देशमुख,शहाजी देशमुख, सुभाष भोसले,आनंदा देशमुख , अविनाश मोकाशी,सागर पाटील, शिवाजी मोकाशी,भास्कर मोकाशी, संजय देशमुख आदिंसह ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.