प्रतिष्ठा न्यूज

नेहरूनगरच्या श्री बालाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नुतन कार्यालयाचे उदघाटन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव: नेहरूनगर येथील श्री बालाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे नूतन वास्तूमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.या कार्यालयाचे उद्घाटन नेहरूनगरचे माजी सरपंच राजाराम जाधव यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील,भारती शुगर्स नागेवाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व निमणीचे माजी उपसरपंच आर. डी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.नेहरूनगर सारख्या लहान गावांमध्ये नंदिवाले समाजातील तरुणांनी एकत्र येऊन संस्थेची स्थापना २०१८ मध्ये केली.संस्थेचे भागभांडवल दहा लाख रुपये आहे.संस्थेमार्फत वाहन व सोने तारणांसह वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज पुरवठा केला जातो तसेच ठेवींवर आकर्षक व्याज दिले जाते अशी माहिती नंदीवाले समाजाचे नेते व संस्थेचे संस्थापक चेअरमन राजेंद्र भोसले यांनी यावेळी दिली.यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन माणीक देशमुख,सर्व संचालक,सेक्रेटरी भास्कर भोसले,तुरचीचे सरपंच विकास डावरे,सर्जेराव देशमुख, प्रदीप मोकाशी,दिलीप भोसले,पंडित पाटील,विश्वास पाटील,आण्णासाहेब महाडिक,सुर्यकांत भोसले, भाऊसाहेब देशमुख,अंकुश भोसले, दिपक भोसले आदिंसह ग्रामस्थ, सभासद उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.