प्रतिष्ठा न्यूज

चिंतामणी नगरचा पुल ३१ जुलै पर्यंत पूर्ण न करता इतर पुलांची कामे सुरू केल्यास बांधकाम बंद पाडणार; रेल्वे कार्यालयावर चाबूक मोर्चा काढणार: नितीनराजे शिंदे यांचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : चिंतामणी नगरच्या पुलाचे काम रखडल्याने सांगलीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तो पूर्ण व्हायच्या आत इतर पुलांची कामे सुरू करून सांगलीचा संपर्क तोडला जात असून नागरिकांचा छळ चालू आहे. ३१ जुलै पर्यंत पुल पूर्ण झाला नाही तर रेल्वे अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर चाबूक मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
नितीनराजे शिंदे म्हणाले, नागरिक आणि व्यापारी यांचे या पुलामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. 24 कोटी किमतीचा पूल पूर्ण करण्यासाठी
तिन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे व्यापारी व उद्योजकांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. विधानसभा अधिवेशन चालू आहे परंतु लोक प्रतिनिधी यावर आवाज उठवत नाहीत. चिंतामणी नगरच्या पुलावरून जाणारा हा राज्यमार्ग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण इथून आटपाडी पर्यंत लोक या पुलावरून येतात आणि जातात. या लोकांना चार किलोमीटरचा वळसा घालून सांगलीत यायला लागतं. त्यात भरीस भर म्हणून ह्याला आता वसगड्याचा जो पूल आहे त्यासाठी आता एक महिना ते बांधकाम चालू करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पंचशील नगर मधनं बायपासला येणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या बांधकामासाठी तो मार्ग बंद करायच्या नादात प्रशासन आहे. म्हणजे पंचशील नगरचा रस्ता बंद, नांद्रे वसगडेचा तिथला रस्ता बंद, सांगली ते पेठ नका या रस्त्याचं काम सुरू आहे. त्या रस्त्यावर लोक जायला तयार नाहीत. वेळ लागतो म्हणून त्या सगळ्या लोकांनी पर्यायी रस्ता म्हणून नांद्रे मार्गे पलूस मार्गे कराडला जायचा मार्ग स्वीकारलेला आहे. तोही बंद झाला तर काय करायचे. त्यात आता कृपाचाई जवळचा पूल मोडकळी आलेला आहे. सांगलीच्या व्यापाऱ्यांचं कोरोनाच्या मध्ये आणि पुरामध्ये प्रचंड अतोनात नुकसान झाले त्यातून तो अजून उभा राहिलेला नाही तोपर्यंत हे सगळे पूल जर बांधायला काढले तर सांगलीची बाजारपेठ पूर्ण उध्वस्त होऊन जाईल. सांगलीत कोण येऊ शकणार नाही असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आमची मागणी आहे की पहिल्यांदा हा जो चिंतामण नगरचा रेल्वेचा उड्डाणपूल आहे तो 31 जुलै पर्यंत पूर्ण करा आणि मगच जे काय तुम्हाला बाकीचे रस्ते बंद करायचे ते करा. आमचं ऐकलं नाही आणि बांधकाम करायचा प्रयत्न केला तर ती बांधकाम जाऊन आम्ही बंद पडणार, उधळून लावणार. जनतेला घेऊन त्या भागातल्या नागरिकांना एकत्र करून आंदोलन केले जाईल. ठेकेदाराने मुदतीत काम केलं नाही म्हणून किती दंड केला. त्याला मुदत वाढ दिली आणि मुदतवाढ दिल्यानंतर हा जो मृत्यूचा सापळा आहे पंचशील नगर रोडचा तिथं जर एखादा रेल्वे अपघात घडला तर कोण ह्याला जबाबदार राहणार आहे. जर ह्या काळामध्ये पंचशील मार्गाने येताना अपघात झाला तर संबंधित अधिकाऱ्यांच्या वर त्याची जबाबदारी असेल. ह्या पत्रकार परिषदेची दखल घेऊन चिंतामणी नगरचा पुल ३२ जुलै पर्यंत पूर्ण करा.
सांगली जिल्ह्यातले बरेच आमदार या भागातून जातात आणि येतात त्यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करून आम्ही ज्या मागण्या मांडल्यात त्यावर चर्चा घडवून आणावी. पहिल्यांदा चिंतामण नगरचा हा जो पूल आहे तो पूर्ण करा बाकीच्या पुलाचे काम नंतर सुरू करावे अशी आमची मागणी आहे. पुलाचे काम रखडल्याने ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना सभागृहामध्ये आवाज उठवून नुकसान भरपाई मिळवून द्या. आणि त्या ठेकेदाराला दंड करून त्याच्यावर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करा. ३१ जुलै पर्यंत पुल पूर्ण झाला नाही तर रेल्वे अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर चाबूक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नितिनराजे शिंदे यांनी दिला.
यावेळी माधवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप बोथरा म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये काम करत असणारे सर्व लोकप्रतिनिधी किंवा समाजसेवी संस्था यांचं लक्ष आम्ही या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न करतोय परंतु दुर्दैवानं अजूनही मनापासून हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नाही. आज सहा महिन्याची मुदत चिंतामण नगर असताना 14 जानेवारी ही डेडलाईन होती. ती संपून आज सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी सुद्धा अजूनही लोकांच्या हाल अपेष्टेकडे कोणीही गांभीर्याने बघत नाही. हा सर्वात दुर्दैवाचा भाग आहे. मागच्या महिन्यात 10 जूनला हे पाडले त्याला एक वर्ष कम्प्लीट झाल. आम्ही पुलाचे श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम घेतला आणि त्यानंतर त्या कार्यक्रमानंतर थोडीशी हालचाल झाली. परत हा प्रश्न सुटत नाही असे दिसते म्हणून आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्याची गरज वाटली.
सांगली शहराचा जर विचार केला तर इस्लामपूर रस्त्यावर काम चालू आहे. लोकांना अतिशय हाल अपेष्टा सहन करून सांगलीला यावे लागते. आज वसगडे पुलाचे काम सुरू आहे लोकांना त्यातून यावं लागतं. आज तासगाव विटा आटपाडी जिल्ह्याचा 50 टक्के भाग ज्या बाजूने येतो त्या चिंतामणी नगर पुलाचा पर्याय बंद झालेला आहे. पण सांगलीत यायचं का नाही असा प्रश्न लोकांना पडला आहे. जिल्ह्यापासून सांगली शहर तोडण्याचा प्रयत्न आहे का? सांगलीला लोकांनी येऊ नये असे हे षडयंत्र आहे. एखादी सोय करत असताना गैरसोयीचा विचार अगोदर करायला हवा. त्यानंतर ते काम वाहतुकीला अडचण न येता कसं करता येईल या दृष्टिकोनातून चर्चा झाली व्हायला हवी होती. जेणेकरून लोकांना ह्या कामाचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने काम करायला पाहिजेत. पण व्यापारी, नागरिक आणि विद्यार्थी कोणाचाच विचार न करता सगळीकडे कामे सुरू आहेत. हजारो कोटींचे नुकसान होत आहे. काही व्यापाऱ्यांनी दुकान विकायला काढली आहेत. चिंतामणी नगरच्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आहे.
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे सांगली शहराध्यक्ष संजय जाधव, सचिन देसाई, माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांच्यासह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.