प्रतिष्ठा न्यूज

मुख्याध्यापक बी. ए. कांबळे विचारातील सकारात्मकता जगण्याचे बळ देईल – अशोक जाधव

प्रतिष्ठा न्यूज
शिराळा प्रतिनिधी : मुख्याध्यापक बी. ए. कांबळे विचारातील सकारात्मकता, आशावाद विद्यार्थ्यांना जगण्याचे बळ देईल. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची हिम्मत देईल. असे प्रतिपादन जाणीव ग्रुपचे काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी मुख्याध्यापक कांबळे सरांच्या सत्कार प्रसंगी केले.
बी. ए. कांबळे यांची नुकतीच उदयगिरी विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली आहे यानिमित्ताने त्यांचा सत्कार जाणीव ग्रुपच्या वतीने करण्यात आला.
यावेळी जाधव पुढे म्हणाले विद्यार्थी आणि कांबळे सरांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरुपाचे आहेत. ते उत्तम प्रकारे मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतीमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवत आहेत. उद्याचे आदर्श नागरिक घडवत आहेत. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे.
यावेळी के. टी. पाटील, के. बी. पाटील, रणवीर जाधव आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.