प्रतिष्ठा न्यूज

डॉ. झैन इकबाल तांबोळी यांना M. Ch. (Urology) Super Specialty पदवी मध्ये गोल्ड मेडल

प्रतिष्ठा न्यूज
मिरज, दि. १९ : डॉ. झैन इकबाल तांबोळी यांनी देशातील नामांकित संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टीट्युट ऑफ मेडीकल सायन्स, (SGPGI) लखनऊ (उत्तर प्रदेश) येथून M. Ch. (Urology) Super Specialty पदवी मध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. तसेच त्यांना SGPGI या संस्थेच्या R. K. Sharma Best M. Ch. Student, 2022 या अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार त्यांना दि. 13/10/2022 रोजी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते संजय गांधी स्नातकोत्तर आयुर्विज्ञान संस्थान, लखनऊ च्या 27 व्या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास मुख्य अतिथी डॉ. एस्. पी. थ्यागराजन, कुलपती, अविनाशीलिंगम इंस्टिट्युट फॉर होम सायन्स एंड हायर एज्युकेशन फॉर विमेन, कोयंबितुर, तामिळनाडु, श्री. ब्रजेश पाठक उप मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश व अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. झैन यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय Urology स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांनी M. B. B. S., M. S. पदवी K. E. M. Hospital, Mumbai मधुन हस्तगत केली.
डॉ. झैन हे मिरजेचे सुप्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. इकबाल व डॉ. सौ. वहिदा तांबोळी यांचे पुत्र आहेत.
डॉ. झैन यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.