प्रतिष्ठा न्यूज

शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी परीक्षा फीस भरण्याची तारीख वाढविण्याची मराठवाडा शिक्षक संघाची मागणी

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
नांदेड दि.19 : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने एकीकडे दिवाळीच्या सुट्ट्या दिल्या तर दुसरीकडे १० वी परिक्षा ची फी भरण्याची तारीख जाहीर केली तेव्हा सदरील १० वी ची परीक्षा फी भरण्याची तारीख वाढविण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघ आणि विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही शालेय विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने दिवाळी सण आपल्या भारत देशातील सर्वात मोठा सण असल्याने शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना २० दिवसांच्या सुट्या दिल्या जातात विद्यार्थ्यी दिवाळी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी आपल्या मामाच्या गावाला जातात . यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिवाळीच्या सुट्ट्या जि.प.नांदेड शिक्षण विभागाच्या वतीने दि. १७ ऑक्टोंबर २०२२ ते ७ नोव्हेंबर २०२२ दरम्यान असुन दि. ८ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती येत असल्याने त्या दिवशी ही राष्ट्रीय सुट्टी राहणार असुन दि. ९ नोव्हेंबर पासुन शाळा सुरू होणार आहे तर मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी च्या परीक्षेची फी भरण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर आहे त्यामुळें १० वी च्या विद्यार्थ्यांना १० वी ची परीक्षा फी भरण्यासाठी केवळ एक च दिवसांची वेळ मिळत असल्याने परीक्षा फी आॅनलाईन भरायची असल्याने साईटवर प्रचंड प्रमाणात लोड येण्याची शक्यता आहे व सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता असल्याची चर्चा जनतेतून होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी तारांबळ होण्याची शक्यता आहे व त्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी अडचण आल्यास त्यांचे एक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( १० वी ची ) परिक्षाचे आवेदनपत्र आॅनलाईन सादर करण्याच्या तारखा जाहिर केल्या असुन १० वी च्या परीक्षेची फी भरण्याची तारीख दि. १९-१०-२०२२ ते दि. १०-११-२०२२ आहे.
पण एकीकडे विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या दि.१७ ऑक्टोंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत दिवाळीच्या सुट्ट्या दिल्या आहेत व दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी गुरुनानक जयंती असल्यामुळे त्या दिवशीही सुट्टी आहे त्यामुळे शाळा प्रत्यक्षात ९ नोव्हेंबर ला सुरू होणार आहे तर १० वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख दि. १० नोव्हेंबर असल्यामुळे १० वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात तारांबळ होण्याची शक्यता असल्यामुळे शासनाने १० वी च्या विद्यार्थ्यांना १० वी च्या परीक्षेची फी भरण्यासाठी आणखी दोन आठवड्याचा कालावधी वाढवावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघ अध्यक्ष श्री सुर्यकांत विश्वासराव,प्रदेश सरचिटणीस श्री राजकुमार कदम यांनी संबंधित अधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.