प्रतिष्ठा न्यूज

निमणी प्रकाश उपसा संस्थेची योग्य चौकशी होऊन निष्पन्न होणाऱ्या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याची आमची तयारी : संस्थापक जगन्नाथ मस्के

निमणी ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : निमणीच्या प्रकाश उपसा जलसिंचन सहकारी संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार झालेला नाही,संस्थे बाबत केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत तर आरोप करणारे माजी संचालक बाळासाहेब पाटील यांना 15 वर्षे संस्थेत संचालक असताना अपहार दिसला नाही का तसेच संचालक पदावरून पायउतार व्हावे लागल्यामुळे हे आरोप एका चांगल्या चाललेल्या संस्थेवर होत आहेत, सभासदांचे हित डोळ्या समोर ठेवून पाणीपुरवठा केलेला आहे याबाबत निपक्षपाती व योग्य चौकशी झाल्यास निष्पन्न होणाऱ्या सर्व गोष्टीना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे,असे मत प्रकाश उपसा जलसिंचन सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ मस्के यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. यावेळी ते म्हणाले संस्थेची व माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.बाळासाहेब पाटील हे संस्थेत 15 वर्ष संचालक होते, आणि आत्ता जे पत्रकार परिषद घेऊन ते जे मुद्दे बोलतात ते मुद्दे ते संचालक होते त्यावेळी त्यांना का सुचले नाहीत.तसेच बाळासाहेब पाटील यांनी गावातील बऱ्याच शेतकऱ्यांकडून बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या नावे कर्जे काढून सबसिडी उचलून अफरातफर करून स्वतः पैसे वापरले आहेत,तसेच पै पाहुण्यांना सुद्धा व्यवहारामध्ये फसवले आहे असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.बाळासाहेब पाटील हे गावातील काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या मार्गदर्शना खाली संस्था व गावास वेठीस धरून गावातील सर्व संस्था बंद पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत,या लोकांनी एक हि संस्था स्थापन केलेली नाही यांच्या ताब्यात एकही संस्था नसल्यामुळे व नुकत्याच पार पडलेल्या निमणी विकास सोसायटी मधील दारुण झालेल्या पराभवामुळे ते दिशाहीन झालेले आहेत, व ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे गावातील सर्व संस्थाची शासकीय चौकशी लावण्याचे कामं चालू आहे.आणि अशा गोष्टी होत राहिल्यास गावाच्या व गावातिल लोकांच्या आर्थिक विकासाला खिळ बसेल असे मत मस्के बापू यांनी व्यक्त केले.मीं पदाचा कोणताही गैरवापर केलेला नाही,तसेच गोडाऊन बांधकाम संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये मंजूरी घेऊन केलेले आहे त्यात सुद्धा कोणताही गैर प्रकार झालेला नाही,पाणीच घेतले नाही त्यामुळे पानिपट्टी बुडवायचा प्रश्नच येत नाही, संस्थेने कोणतीही गुंतवणूक बेकायदेशीर केलेली नाही,थकबाकी असणाऱ्या कोणत्याही सभासदांस पाणीपुरवठा करण्यात आला नाही, संस्थेचे सर्व व्यवहार हे चेक मार्फतच झालेले आहेत, चौकशी अधिकाऱ्यांनी बँकेत चौकशी न करताच अहवालात माहिती सादर केलेली आहे, त्यामुळे बाळासाहेब पाटील यांनी केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत संस्थेची चौकशी झाल्यानंतर जो अहवाल चौकशी अधिकाऱ्यां कडून प्राप्त झालेला आहे त्यामध्ये प्रचंड तफावत आहे, यामध्ये कोणतीही शहानिशा समक्ष साक्ष न करता अहवाल देण्यात आला आहे याबाबत आम्ही सहकार न्यायालयात धाव घेणार असून खातेनिहाय फेरचौकशीची मागणी करणार आहोत, तसेच योग्य व निपक्षपाती चौकशी झाल्यानंतर प्राप्त निर्णयास व अहवालास आम्ही स्वीकार करू तसेच योग्य त्या कारवाईस सामोरे जाऊ असे स्पष्टीकरण व मत जगन्नाथ मस्के यांनी व्यक्त केले आहे.यावेळी बाळासाहेब पाटील,जालिंदर मस्के, विजय कोळी,दिनकर पाटील,दीपक पाटील, शहाजी शिंदे, बाळासाहेब यादव, गजानन मस्के उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.