प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या आनंद सागर पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजची मान्यता रद्द करा..मनसेच्या अमोल काळे यांची शिक्षणअधीकारी यांच्याकडे तक्रार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव येथील आनंदसागर पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मॅनेजमेंट कडून विध्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असून,या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवास हा इन्शुरन्स संपलेल्या व पूर्वीचे गुन्हे दाखल असलेल्या ब्लॅक लिस्टेड तसेच पासिंग नसलेल्या स्कुल बसमधून केला जात आहे.काही दिवसापूर्वी शाळेच्या बसचा अपघात होऊन तुरची येथील किरण साळुंखे या युवकाचा मृत्यू झाला आहे.त्यावेळी संबंधित बस मध्ये 20 ते 22 विद्यार्थी होते.क्षमतेपेक्षा जास्त विध्यार्थी बसवून आर टी ओ नियमांचे उल्लंघन करत संस्था नागरिक आणि विध्यार्थी यांची जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे,तसेच संस्थे कडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून भरमसाठ फी घेतली जाते परंतु त्या पद्धतीची सोय शाळेच्या मॅनेजमेंट कडून केली जात नाही हे स्पष्ट झाले आहे.तरी या संपूर्ण प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून येत्या 8 दिवसात संस्थेची सखोल चौकशी करून त्यांचा परवाना रद्द करावा व यास जबाबदार असणारे संस्थेचे संस्थापक यांच्या वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मनसेच्या वतीने शाळे समोर आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी निवेदनाद्वारे शिक्षण अधिकारी सांगली यांना दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.