प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना परीक्षा (N.M.M.S.) मध्ये न्यू इंग्लिश स्कूल बेडग या विद्यालयाचे घवघवीत यश

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे – १ यांचे मार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना परीक्षा(N.M.M.S.) घेतली जाते. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून त्यांना प्रोत्साहन दिले जाते व शैक्षणिक मदत म्हणून त्यांना अर्थसहाय्य देखील केले जाते.याच धर्तीवर रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, बेडग या विद्यालयातील एकूण ३४ विद्यार्थी सदर परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.पैकी १३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. ओमासे अमृता बाळासाहेब, ओमासे तेजस सुभाष, थोरात साक्षी काकासो या विद्यार्थ्यांना रू.१२ हजार प्रमाणे सलग चार वर्षांसाठी रु.४८ हजार इतकी तर भगत मयुरी वसंत,जाधव धनश्री प्रमोद, चव्हाण अरुंधती राजेंद्र, देसाई नंदिनी अनिल, पाटील स्नेहल बापूसो, नलवडे आदिती तानाजी,जाधव प्राची पोपट, पाटील कोमल दिलीप, पाटील प्रांजल प्रदिप, शिंदे प्रथमेश सुनिल या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रू.९६००प्रमाणे सलग चार वर्षांसाठी रू. ३८,४०० इतकी शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. विद्यालयाचे उपशिक्षक मच्छिंद्र वाघ यांनी या परीक्षेचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास पाटील आणि पर्यवेक्षिका उज्वला ढेरे विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, ग्रामस्थ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.