प्रतिष्ठा न्यूज

दि .बा .पाटील यांची अखिल भारतीय शिव-मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

प्रतिष्ठा न्यूज
इस्लामपूर दि 19 (वार्ताहर ) : कामेरी ता. वाळवा येथील जेष्ठ साहित्यिक कादंबरीकार दि. बा .पाटील यांची अखिल भारतीय शिव-मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली .
जळगाव जिल्ह्यातील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी पन्हाळगडावरती दुसरे अखिल भारतीय शिव-मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक दि .बा. पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती फाउंडेशन चे
संस्थापक अध्यक्ष श्री शिवचरण उज्जैनकर यांनी दिली आहे .आजवर विविध विषयावर अनेक कथा कादंबऱ्या लिहून दि.बा. पाटील यांनी मराठी साहित्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.संगळीव कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्य चळवळ वाढीसाठी त्यांनी अनेक साहित्य संमेलने आयोजित करून भरीव काम केले आहे शिवाय मराठी साहित्यातील प्रतिष्ठेचे समजले जाणारे अनेक पुरस्कार त्यांच्या आजवरच्या साहित्यकृतींना मिळाले आहेत त्यांच्या अध्यक्ष निवडीमुळे जिल्ह्याच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. या संमेलनाचे उद्घाटन भारताचे माजी परराष्ट्र सचिव व ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार असून पन्हाळ्याचे एन. के. भोसले या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप, कॅप्टन गणपतराव घोडके, डॉ.श्रीकांत पाटील, डॉ. प्रतिमा इंगोले, संतोष कुमार बजाज पद्मश्री नीलिमाताई मिश्रा, ज्येष्ठ विचारवंत डॉ.सतीश तराळ इत्यादी मान्यवरांची उपस्थिती आहे अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे आजवरच्या माझ्या साहित्य क्षेत्रातील प्रवासाला योग्य न्याय मिळाला आहे . यामुळे यापुढेही मराठी साहित्याची सेवा करण्याची नवी उमेद घेवून यापुढील वाटचाल करणार असल्याची भावना दि.बा पाटील यांनी व्यक्त केली

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.